करोनाचा काळ म्हणजे साऱ्या जगाला भयभीत करणारा काळ होता.संकटाचा महा डोंगरच अल्पकाळात तयार झालेला होता.आपलाच माणुस आपल्या माणसाला समोर आला की,सैरावैरा भित पळत एकांतात पळत होता.माणूस माणसा पासून हात -दोन हात लांबच हात होता.अशा परिस्थिती एक एक दिवस कसा तरी कटत होता.सर्व काळ इथे थांबल्या सारखा वाटत होता.या काळात वेगाने धावणारे वस्तु,यंत्रा पासून माणसा पर्यत अनिश्चीत काळासाठी थांबलेली होती.अशा कठिण दिवस चालेल्या काळातल्या एका भर दुपारी गावाकडून नातेवाईकाचा फोन आला की,पेंशटची बीपी खूप वाढली आणी त्यात उलटी होवून एका साईडचे हात पाय थोडे थरथरत आहेत.हदगावच्या डाॅक्टर दवाखान्यात घेत नाही.नांदेडला दवाखान्यात येतोय.
कुठल्या दवाखान्यात जावे ? या प्रश्नामुळे सध्याचा कारोनाचा वातावरणामुळे काळजी तर वाढलीच पण माझी तळमळ वाढलेली पेंशटची…त्यात मी कार्यालयात … साहेब समोर… हातात अत्यंत महत्वाचे कामही असल्यामुळे ते ही अर्धवट सोडून जाता येईना… तिकडून नातेवाईकाचे फोन तर मला सारखेच येत होते.साहजिकच मी आरोग्य विभागात काम करतोय आणी पेंशट ही ग्रामीण भागातून येत असल्यामुळे त्या पेंशटच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करणे आवश्यक होते.त्यामुळे मी शक्य तेवढे फोनवर रुग्णालयात घेवून जा… त्या रुग्णालयात घेवून जा म्हणून… मी इकडून सांगत होतो. तसे ते नातेवाईक बिच्चारे… नांदेड शहरात या त्या रुग्णालयात फिरुन फिरुन आले.परंतू कोणत्याच रुग्णालयात पेंशटवर उपचार तर नाहीच पण रुग्णालयात दाखल ही करुन घेत नव्हते.
जिकडे तिकडे कोरोनाचे सावट पसरलेले होते.प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झालेले होतेे.अशा सर्व बिकट परिस्थिती मध्ये वेळे नुसार संकट काळात एक कुंटूब प्रमुख म्हणून जसा कुंटुबाच्या पाठीमागे खंबीर उभा राहून आपल्या कुंटूबावरचे आलेले संकट दुर करण्याचा प्रयत्न करतो.अगदी तसाच अनुभव त्या दिवशी मला आलेला होता. कार्यालय म्हणजे कुंटूबच आणी त्या कार्यालयाचा कुंटूब प्रमुख हा आपला जेष्ठ अधिकारी साहेब असतो. त्यांनी वेळेनुसार ,परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय हे आपल्यासाठीच असतात. चांगल्या परिणामासाठी असतात.प्रशासनाच्या सोई साठी व त्या त्या वेळेच्या गरजेसाठी असतात.त्यामुळे परिस्थीती तपासून,पाहून त्या प्रमाणे निर्णय घ्यावे लागतात.
त्यानुसार मी परिस्थिती कुंटूंब प्रमुख म्हणून नातेवाईक पेंशट बाबत सांगितली ते आपल्या सरांनी म्हणजे मा.डाॅ.आकाश देशमुख यांनी शांत ऐकून,लगेच ओळखून घेतली.मला निट विचारुन परिस्थिती समजून घेतली.त्यानंतर मग लगेच त्यांच्या परिचयाच्या डाॅक्टरला संपर्क केला.माझ्या गावाकडून येणाऱ्या पेंशटला त्या रुग्णालयात दाखल करुन घेयाला सांगीतले.काही वेळा नंतर पुन्हा थोड्या वेळाने डाॅ.आकाश देशमुख सरांनी फोन करुन रुग्णाची चौकशी ही केली. काही मदत लागते का ते विचारुन घेतले.
ही कृत्ती,कार्य त्या कोरोनाच्या भयानक संकटाच्या काळात, मृत्यूच्या तांडव काळात माझ्या मनात कायम स्मरणात राहून गेली..सरांनी त्यांचे जे कुंटूब प्रमुख म्हणून कर्तव्य निभावले.ते अतिशय मोलाचे वाटले.ग्रेट वाटले. म्हणून हा अनुभव इथ शेअर्र करतोय…सामाजिक कार्याचा वसा खरे तर त्यांच्या घरातूनच मिळाल्यामुळे आणी अभ्यासूवृत्ती मुळे शक्य तेवढे चांगले करुन पुढे चालणारे,कधी ही कुठे ही हेतू पुरस्कर त्रास वैगरे न देणारे, आपल्याच पध्दतीने आपली वेगळीच वाटचाल निर्माण करुन कार्यातून सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आदरणीय डाॅ.आकाश देशमुख सरांकडून खूप काही शिकण्या सारखे,घेण्या सारखे नक्कीच आहे.बाकी सरांच्या बाबतीत सरांची माफी माघून एक नमुद करावे वाटते ते म्हणजे सरांना सही आणी फोन या बाबत मात्र चांगलाच कंटाळा… 🙏
लेखक…😊॥ विजय चव्हाण ॥ सहाय्यक अधिक्षक,
हत्तीरोग नियंत्रण पथक,नांदेड. 🌸साहेबांना वाढदिवसाच्या आरोग्यमय शुभेच्छा….| | ★🔶🔹