आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात -NNL

0

नांदेड। आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आवडीनुसार शिक्षण घ्‍यावे. शिक्षण हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच आपल्याला प्रगती साधता येते, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

लोहा तालुक्‍यातील माळाकोळी येथे पीएमश्री योजनेअंतर्गत जिल्‍हा परिषद शाळा वर्ग खाली बांधकाम व ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते आज शुक्रवार दिनांक 28 जून रोजी करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या प्रसंगी सरंपच गंगाबाई माधवराव तिडके, प्राथमिक विभागाच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गट विकास अधिकारी डी.के. आडेराघो, पोलिस निरिक्षक संजय निलपत्रेवार, उपसरपंच आरती संघपाल कांबळे, शाळा व्‍यवस्‍थापन समिती अध्‍यक्षा वंदनाताई कृष्‍णा केंद्रे, उपाध्‍यक्षा रुक्मिनबाई संग्राम केंद्रे, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य बाजीराव पाटील भालेराव आदींची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, विद्यार्थी हेच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहेत. मेहनत, सचोटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्‍ही तुमचे स्‍वप्‍न पूर्ण करु शकता. भारतीय शास्‍त्रज्ञ व देशाचे महामहिम राष्‍ट्रपती ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांनी मेहनतीने व कष्‍टाने मिसाईल मॅन म्‍हणून ओळख निर्माण केली. आपणही त्‍यांची प्रेरणा घेवून कष्‍ट व जीद्द ठेवून ज्ञानार्जन करावे, असे प्रतिपादन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

प्रारंभी पीएमश्री योजने अंर्तगत वर्ग खोली बांधकाम, ग्रामपंचायतीच्‍या वतीने करण्‍यात येणा-या रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, पंधरावा वित्‍त आयोग अंतर्गत शाळेतील विंधन विहीर बोरवेलचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीलन करनवाल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍यांनतर उपस्थित मान्‍यवरांचा ग्रामपंचायत व शाळेच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी त्‍यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपनही करण्‍यात आले. याप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. तसेच प्रश्‍नोत्‍तरानंतर त्‍यांनी विद्यार्थ्‍यांसोबत सेल्‍फी घेतली. यावेळी त्‍यांनी शाळा व गावची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले.

या कार्यक्रमाला सामाजीक कार्यकर्ते माधवराव तिडके, संघपाल कांबळे, कृष्‍णा केंद्रे, संग्राम केंद्रे, माळाकोळी पत्रकार संघाचे अध्‍यक्ष अर्जूनसिंह बयास, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्‍वीयसहाय्यक शुभम तेलेवार, शिक्षण विस्‍तार अधिकारी मलवाड मॅडम, उपअभियंता शिवाजी राठोड, ग्राम विकास अधिकारी संभाजी धुळगंडे, मुख्‍याद्यापक जायभाये, शाळेचे शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी, पालक व गावकरी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here