नवीन नांदेड। नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. मोहनराव हंबर्डे यांच्ये कट्टर समर्थक नांदेड दक्षिण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अस्लम यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ५ जुन रोजी सिडको परिसरातील महाराणा पुतळा चौक भागात मिठाई व फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला ,यावेळी महाविकास आघाडीच्या विजय असो प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली.
नांदेड लोकसभा मतदार संघातून वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर सिडको काँग्रेस कमिटीच्या पक्षाच्या पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते यांनी ५ जुन रोजी सायंकाळी सिडको परिसरातील महाराणा पुतळा परिसरातील चौकात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत जल्लोष मध्ये आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेना ऊबाठा गटाचे सिडको शहर प्रमुख जितुसिंग टाक,निवृत्ती जिकंलवाड,ब्रिजलाल ऊगवे, साहेबराव मामीलवाड, कृष्णा पांचाळ, शिवसेना महिला आघाडीच्या निकिता शहापुरवाड, नांदेड शहर महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ.करूणा जमदाडे,वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सिडको शहर अध्यक्ष योगेश भरकड, जेष्ठ पदाधिकारी प्रल्हाद गव्हाणे,ॲड.प्रसेनजित वाघमारे, शेख नुरोधदीन,शेख मुजोहोध्दीन, शेख अशफाक, एस.पी. कुंभारे, संजय कदम, बाबुराव अवनुरे,प्रभु ऊरत वाड,सुनिता कांबळे, विमल बाई ढवळे,ज्योती ताटे, अनिता जमदाडे, विमल बाई चिते,अजय पदमवार, सुशांत बंडेवार,पिंटु मेकाले, राम कदम, शशिकांत गाढे, डि.वाय. मिसाळ, गौरव दरबस्तवार,महंमद शकील, अहेमद शेख, शेख रहिम, जमील सय्यद,शेख सय्यद शोएब,महंमद फिराज,शेख मुकरम,शेख अहमद,शेख फरिद, शेख सिबु, शेख फेरीत शेख अजिम,महमद जहिर,अब्दुल वसीर, शेख जैद, शेख साजिद,सयद रिहाण,महंमद वसिम, यांच्या सह महिला युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी गुलाल उधळून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी घोषणा दिल्या.