नांदेड| पोलीस स्टेशन भोकर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण किंमत 1,49,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


आरोपी सदाशिव ऊर्फ सदानंद शंकर गोरे वय 26 वर्षे धंदा मजूरी रा. रेणापूर ता. भोकर जिल्हा नांदेड यांच्याकडून 30,000/- रू किमतीची एक काळया रंगाचे स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्र MH-26-Z-0705 इंजिन क्र.HA10EAAHF03583 व चेसीस क्रं.MBLHA10EEAHF20804, 84,000/- रू कि. एक काळया रंगाचे होंडा शाईन कंपनीचे मो.सा.क्रं. MH-26-CS-0867 इंजिन क्रं. HC15EG1355981 व चेसीस क्रं.ME4HC152GRG355981, 35,000/- रू कि, एक काळया रंगाचे स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्रे MH-26-S-2909 इंजिन क्र.07M15E03687 व चेसीस क्रं.07M03F07084, असा एकूण 1,49,000/- रू चे मुद्येमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी पो.स्टे हधीतील मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले. त्यावरून पोलीस स्टेशन भोकर येथे दिनांक 25/02/2025 रोजी फिर्यादी नामे मारोती आनंदराव पुजारवाड वय 27 वर्षे, व्यवसाय शेती रा. नागापूर ता. भोकर मो.नं. 8208495375 यांनी पो स्टे.ला येवून फिर्याद दिली की, दिनांक 25/02/2025 रोजीचे 17.30 वा.चे सुमारास त्यांचे भावजी नामे गजानन नथुराम गोरलेवाड यांचे मालकीचे काळया रंगाचे स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्रं MH-26-Z-0705 इंजिन क्रं. HA10EAAHF03583 व चेसीस क्रं.MBLHA10EEAHF20804 ही भोकर येथील बसस्थानकाचे बाजूला असलेल्या पारस ज्यूस सेंटर या हॉटेलचे समोरील रोडवर लावून हॉटेलमध्ये ज्यूस पिण्याकरिता जावून परत थोड्या वेळाने बाहेर आल्यानंतर दुचाकी दिसली नाही. कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे फिर्याद दिल्याने पो.स्टे. भोकर येथे गु.र.नं. 87/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये दाखल असून सदर गुन्हयाचे तपास पोहेकों /1173 सोनाजी कानगुले हे करीत होते.

सदर गुन्हयाचे तपासात अजित कुंभार यांना मिळालेल्या माहितीचे आधारे पोहेको. सोनाजी कानगुले व पोकों. प्रमोद जोंधळे हे सदर गुन्हयाचे तपास व पट्रोलिंग करीत असताना सदाशिव ऊर्फ सदानंद शंकर गोरे वय 26 वर्षे धंदा मजुरी रा. रेणापूर ता. भोकर जिल्हा नांदेड हा सदर गुन्हयात चोरून नेलेल्या मो.सा.सह मिळून आला. त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेवून तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचे ताब्यात मिळालेल्या मो.सा.चा दोन पंचासमक्ष पंचनामा करून त्यास कायदेशिरित्या दि.26/02/2025 रोजी अटक करून मा. न्यायालयात 03 दिवसाचे पी.सी. आर. कामी. हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीचा दि.28/02/2025 रोजी पोवतो पी.सी. आर. मंजूर केला होता.

पी.सी. आर. मध्ये सदर आरोपीकडे विश्वासात घेवून अधिक कौशल्याने तपास केला असता त्याने इतर दोन मो.सा.चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडून सदर गुन्हयात चोरीस गेलेल्या 1) एक होंडा शाईन कंपनीचे मो.सा.क्रं. MH-26-CS-0867 2) एक स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्र MH-26-S-2909 अशा दोन मो. सा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपीकडून पो.स्टे. भोकर येथील (1) गु.र.नं. 87/2025 कलम 303(2) भा. न्या.सं. (2) गु.र.नं. 90/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. व (3) गु.र.नं. 91/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. असे एकूण 03 मो.सा.चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 03 मो. सा. एकूण किं. 1,49,000/- रूचे मुद्येमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचे अधिक तपास पोहेकों. सोनाजी कानगुले भोकर हे करीत आहेत.