नवीन नांदेड l इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नवीन नांदेड येथे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे परीक्षा केंद्र होते. पाचवीच्या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक बकवाड व आठवीच्या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक नागनाथ बडूरे यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे परीक्षा केंद्रात स्वागत केले,दोन्हीही केंद्र प्रमुखाच्या या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी आनंदी झाले व त्यांना प्रोत्साहन मिळाले.


पाचवीच्या केंद्रात पर्यवेक्षक म्हणून सज्जन, ताटे, मुंगल, नरवाडे ,खंदारे , यांनी उत्कृष्ट काम केले.
आठवीच्या पर्यवेक्षणाचे काम एम. टी. कदम , बामणे, चिलकेवार, , साखर पडोळे , नल्लेवार ,योगेश पाटील, आर.बी.पवार व शिक्षकेतर कर्मचाऱी गंगातीरे व डी.आर. पवार यांनी योगदान दिले. सर्वांच्या सहकार्याने शिष्यवृत्ती परीक्षा व्यवस्थित पार पडली. सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
