हिमायतनगर, अनिल मादसवार| दिव्यांग निराधार आणि शेतकरी यांच्या अडचणी सोडविण्यात होत सलेली टाळाटाळ दूर करून तात्काळ न्याय द्यावा. या मागणीसाठी शेकडो महिला- पुरुष लाभार्थींचा मोर्चा प्रहारचे हदगाव तालुका प्रमुख तथा विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार अनिल कदम यांच्या नेतृत्ववात हिमायतनगर तालुका दंडाधिकारी कार्यालयावर दिनांक ०७ रोजी दुपारी धडकला. यावेळी अनुपस्थित असलेल्या तहसीलदाराच्या खुर्चीला निवेदन लावून कुलूप लावण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या आंदोलकांनी केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन घ्यायला लावल्याने आंदोलनकर्त्यांनी शांततेत निवेदन देऊन तात्काळ मागण्या पूर्ण केल्या नाहीतर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
हिमायतनगर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील दिव्यांग, निराधार आणि शेतकरी यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक ०७ ऑकटोबर रोजी शेकडो महिला – पुरुषांना घेऊन भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी तहसील कार्यालयात पोचल्यानंतर तहसीलदार नसल्याने त्यांच्या कक्षात आंदोलकांनी प्रवाहस करून अनु[अस्थिती बाबत निषेध केला. तसेच तहसीलदारांच्या खुर्चीला निवेदन लावून कक्षाला कुलूप लावण्याचा प्रयत्नात असताना नायब तहसीलदार तांडेवाड, पोलीस निरीक्षक अमोल भागात यांनी येऊन आंदोलकांची समजूत घातली. यावेळी मंडळ अधिकारी प्राप्त अहवालानुसार प्रति दिव्यांगाना अंत्यदोपाचा लाभ मिळावा, निराधाराचे रखडलेले केंद्र शासनाचे अनुदान तात्काळ वाटप करावे, शेतकऱ्यांचे शेतीतील पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व कामे मनरेगा MREGS योजनेमध्ये सामाविष्ट करावे, दि.02.09 2024 रोजी शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली, त्याच्या याद्या तात्काळ जाहीर करण्यात याव्या.
हिमायतनगर तालुक्यातील दिव्यांगांना प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील 5% निधी तात्काळ वाटप करून तसे आदेश प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात द्यावे, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग शोध मोहीम राबवावी, सर्व दिव्यांगाना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तेलंगाना राज्याच्या धरतीवर दिव्यांगाचे मानधन 6.000/- करावे, शेतकरी लाभार्थी स्टॅम्प असलेल्या शिधापत्रिका धारकास पूर्ववत धान्य देण्यात यावे किंवा शासनाने जाहीर केलेले मानधन तात्काळ खात्यात वर्ग करावे, हिमायतनगरात दिव्यांगाना व्यवसाय उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, दिव्यांगासाठी सार्वजनिक शौचालय उभारावे, पंचायत समितीत शिल्लक दिव्यांगाचे साहीत्य तात्काळ वाटप करावे करावे, हिमायतनगर नगरपंचायतमार्फत दिव्यांगाचा 5% निधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान वाटप करावे, शिधापत्रिकेच्या ऑनलाईन कामामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ऑनलाईन पध्दतीत सुधारणा करुन तात्काळ सेवा देण्यात यावी अश्या अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने आज भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी वरील मागण्याचे निवेदन पुन्हा देण्यात येऊन वरील सर्व मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा येत्या काळात हिमायतनगर तहसिल कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, प्रहारचे हदगाव तालुका प्रमुख अनिल कदम, प्रहारचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष दत्ता पाटील देशमुख, उपतालुका प्रमुख विश्वनाथ कानोटे दत्ता आंबेपवाड, शहर प्रमुख माधव कानोटे, निवृत्ती देवसरकर, दीपक सूर्यवंशी, आदिनाथ पाटील देवसरकर, साईनाथ पवार, मंगेश देवसरकर आदींसह शेकडो दिव्यांग, निराधार, आणि शेतकरी महिला – पुरुष उपस्थित होते.