लोहा| मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम अतिशय चांगला व स्तुत्य आहे. शाळांच्या गुणात्मक व भौतिक विकासासाठी उपयुक्त आहे परंतु केंद्रस्तरावर मुल्यांकन करताना अधिक गुण संपादन करणाऱ्या शाळांवर अन्याय होत आहे. मूल्यमापनातील दोष दूर करावा अशी मागणी: जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे कार्यकरणी सदस्य मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अभियान उपक्रम शालेय विभागाकडून राज्यभर राबविण्यात येत आहे.. या अनुशंगाने केंद्र स्तरावर या वर्षाचे मूल्यांकन झाले , तालुका- जिल्हा स्तरीय मूल्याकन होत आहे. केंद्र स्तरावर जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापन यातून एक-एक शाळांची तालुकास्तरीय मूल्यांकना साठी निवड केली जाते. परंतु अधिक गुण • असलेली शाळा मागे राहते व अन्य केंद्रात कमी गुण असलेली शाळा तालुका स्तरासाठी पात्र ठरते. त्यामूळे एकाच केंद्रात सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्या शाळा जसे १४०गुण घेणारी शाळा तालुकास्तरावर तर त्याच केंद्रातील १३८ गुणांची शाळा बाद होते. शिवाय अन्य केंद्रात ५१ गुण घेणारी शाळा तालुकास्तरासाठी मूल्यांकन पात्र ठरते त्यामुळे १३८ गुण घेणाऱ्या शाळेवर ‘ अन्याय होत आहे.
मूल्यांकनातील केंद्र निहाय गुणानुक्रमे पहिली शाळा ‘ निवड केली जाते एकाच केंद्रातील दुसन्या क्रमाकांची सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्या “शाळेसाठी हे मूल्यमापन निवड प्रक्रिया मारक ठरते. त्यामुळे मूल्यमापनातील ही त्रुटी दूर, करावी सर्व केंद्रातून दोन्ही व्यवस्थापनात गुणानुक्रमे येणाऱ्या शाळांची निवड तालुकास्तरीय स्पर्धेसाठी करावी.
मुख्यमंत्री माझी शाळा -सुंदर शाळा अभियान अंतर्गत केंद्र स्तरावरील सहभागी शाळा तपासणीच्या मूल्यमापनतील त्रुटी दूर करावी. अशी मागणी नांदेड जिल्हा मुख्याध्यापक संघटनेच्या कार्यकरणी सदस्य मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केलो या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, संचालक शिक्षण, शिक्षण उपसंचालक्,, जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.