किनवट, परमेश्वर पेशवे। भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने राज्यातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत.
मात्र किनवट तालुका हा बहुतांश जंगलांनी व्यापलेला असून अशा या किनवट आदिवासीबहुल भागातील इस्लापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रियेसाठी किंवा महिलांच्या बाळंतपणासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षापासून येथे राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणे बंद होते.
मात्र आता या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने तब्बल चार ते पाच वर्षांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्यांदाच संगीता सुनील कुसुमवाड राहणार पांगरी या महिलेने कन्यारत्न बाळाला प्रथमच जन्म दिल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी त्या महिलेचे स्वागत केले आणि बिनटाका राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराद्वारे जवळपास 23 ते 25 महिलांचे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी यावेळी माहिती दिली आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्जन डॉक्टर संतोष अंगटवार, तालुका आरोग्य अधिकारी के पी गायकवाड, डॉक्टर प्रदीप शिंदे, डॉक्टर सातपुते, डॉक्टर भाजे सर, डॉक्टर सातोरे ,डॉक्टर बाशेटी, डॉक्टर अवाड, डॉक्टर भारती, डॉक्टर जानगेवाड मॅडम, डॉक्टर फोले, सुपरवायझर एस के कोंडावार, एन पी चव्हाण, पेटी पांढरपिसे, एम पी चव्हाण, आरोग्य सेविका काकडे मॅडम, कहाळे मॅडम, नामेकर मॅडम दांडेगावकर मॅडम राठोड मॅडम झंपलवाड मॅडम गोपणवाड मॅडम स्वाती कोडमड, शिल्पा धुमाळे. आरोग्य सेवक मेटकर,ताडेवाड, चव्हाण, जाधव, भालके, सेवक निकिता ठाकूर, साई भुतापले, सहाय्यक सेविका शांताबाई अनेलवाड, मुमताज शेख यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.