बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणूक साठी सरासरी ६३ टक्के मतदान -NNL

    0

    नविन नांदेड। नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले असून सकाळपासूनच मतदानासाठी महिला पुरुष युवक, युवती जेष्ठ नागरिक यांच्या उत्साह दिसून आला तर दुपारी तीन पासून मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा दिसुन आल्या ,बारा मतदान केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,यांनी भेट देऊन कायदा व सुव्यवस्था पाहणी केली तर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

    बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणूक साठी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान मतदान झाले, या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतुन संरपच पदासाठी ७ तर१७ ग्रामपंचायत सदस्ययासाठी साठी ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते, १२ मतदान केंद्रावर मतदान सुरूळीत झाले.

    या निवडणूक प्रक्रिया दरम्यान नायब तहसीलदार स्वामी, कुलकर्णी ,देवयानी यादव यांनी भेट दिली,तर निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ,क्षेत्रीय अधिकारी गोविंद मांजरमकर,व साहयक म्हणून विजय रणविरकर,रामेश्वर भिंगोरे,रायटेक, ग्रामसेवक मारोती वाघमारे व कर्मचारी यांनी काम पाहिले. या निवडणुकीत ७ संरपच पदाचे व १७ ग्रामपंचायत सदस्यसाठी ८५ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २०डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

    ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चारही गावात निवडणूक शांततेत..
    ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बळीरामपुर , सिध्दनाथ, पांगरी, मार्कंड येथे ग्रामपंचायत निवडणूक शांततेत झाली,यात बळीरामपुर येथे १२ मतदान केंद्रावर ६३ टक्के, तर सिध्दनाथ ३ केंद्रावर ८९ टक्के, पांगरी येथे ३ केंद्रावर ८७.टक्के,मार्कंड येथे ,३ मतदान केंद्रावर८९ टक्के शांततेत मतदान झाले असून ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही गावात व बुथनिहाय पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, गोपनीय शाखेचे पोलिस अंमलदार बालाजी दंतापले व पोलीस अंमलदार चंद्रकांत बिराजदार यांनी दिली.

    Previous articleभायेगावाचा विकासासाठी कटिबद्ध..आ.मोहन हंबर्डे -NNL
    Next articleतायक्वांदो ,बॉक्सिंग स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयास सुवर्ण पदक -NNL
    nnlmarathi.com
    Is Most Popular Marathi News Website from Nanded (India). We not only break news या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि लेखक, वार्ताहर, पत्रकार, संबंधित जाहिरातदारांची आहे. यास NNLMARATHIन्यूजचे प्रकाशक, संचालक/संपादक, मालक यांची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती, मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. यावरून काही वाद-विवाद निर्माण झाल्यास ते हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविले जातील.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here