हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता दोन वर्षापुर्वी मोठा प्रकल्प आ.माधवराव पा. जवळगावकर यांनी अनेक प्रयत्न करुन आणला. म्हणून त्यावेळी ढिंडोरा पिटण्यात आला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र सुवर्ण जयती नगरोत्थान अंतर्गत प्रशासन संचालनालय मार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यावेळी शहराची नागरिकाच्या पिण्याच्या पाण्यासाठी गरज लक्षात घेता कोणतही या बाबतीत तांत्रीक अडचणी निर्माण न करता जीवन प्राधिकरणाने लगेच ताञिक मान्यता पण दिली होती.
या शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास 47 कोटी रु मंजुर पण झाले. प्रलंबित शहराच्या नागरिकाच्या दृष्टीने जीवलग प्रश्न मार्गी लागला. याच टेंडर पण निघाले माञ हे टेडर कोणत्या एजन्सी घेतले. या बाबतीत माञ कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या प्रकल्पाचे कामाला सुरुवात झाली होती काही अँडव्हानस रक्कम पण अदा करण्यात आल्याची माहीती आहे. सदर योजना 30 वर्षापर्यत चालणार असल्याची माहीती असुन, पाणी पुरवठ्यासाठी शाश्वत नवीन जागेत नवीन काम सुरु झाले की नाही यांची माहीती प्रशासनाने स्थानिक माध्यामांना दयायला हवी होती. तशी माहीती पण देण्यात आलेली नाही. 170 एचपी चे दोन व्हि.टी पंप ठीकाणी प्रस्तावित आहे तसेच शुद्ध पाण्यासाठी 40 व12.5 एच.पीचे नवीन पंप आहेत. 47 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना बारगळणार तर नाही ना ..अशी चर्चा नागरिकात ऐकवायास मिळत आहे.
हे प्रकल्प बारगळणार तर नाही ना ..
ज्या एजन्सीला 47कोटीच पाणी पुरवठा प्रकल्पचा काम देण्यातआलेल आहे. त्या एजन्सीला ह्या कामाचा अनुभव आहे काय..? सदर कामाला सुरुवात झाली तरी नेमके काम किती झालेले आहे. या बाबतीत माञ न.पा.प्रशासना कडुन वेळोवेळी आढावा अपेक्षित असताना माञ तसे काही दिसुन येत नाही. सदर प्रकल्प जलशुध्दीकरण तात्कालिक मुख्यमंत्री आशोक चव्हाण याच्या हस्ते उद्घाटन दोन वर्षापुर्वी धुमधडक्यात झालेले होते. सध्या स्थितीत 70एलपीसीडी पाणीपुरवठा योजना ही हदगाव शहरा करिता पुरेशी नव्हती.
आ.माधवराव पा. जवळगावकर यांनी शहराच्या पाणी पुरवठ्या प्रकल्प करिता 47 कोटी ची मंजुरी मिळवून दिली. मग त्यांनी याबाबत कामाचा आढावा का.. घेतला नाही स्थानिक माध्यामाना या बाबतीत माहीती दयायला हवी होती. माञ स्थानिक माध्यम काही अपवाद वगळता ते माध्यामापासुन कोसो दुर आहेत. शासनाकडुन दि. 22 एप्रिल 2022 रोजी या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. नेमके काम कुठे सुरु आहे. या बाबतीत प्रशासनाकडुन माहीती मिळत नाही.
न.पा.मुख्याधिकारी यांची माहीती..
या बाबतीत प्रस्तुत प्रतिनिधीने महाराष्ट्र सुवर्ण जयती नगरोत्थान अतर्गत पाणी पुरवठ्याच्या ह्या प्रकल्पचे काम सुरु आहे. ते काम प्रगतीपथावर असल्याची माहीती हदगाव न.पा.चे मुख्याधिकारी नितिन लुंगे यांनी दिली. माञ हे काम कुठे व किती प्रमाणात झालं या बाबतीत त्यांनी काही सागितलेले नाही. सदर प्रकल्पाचे काम गेल्या दोन वर्षापासुन संथगतीने चालु आहे ही वस्तुस्थिती आहे.