अखर्चित निधी प्रकरणी किनवट तालुक्यातील बोधडी ग्रामपंचायत कारणे दाखवा नोटीस -NNL

0

किनवट,परमेश्वर पेशवे। बोधडी खुर्दकरांना १५ वा वित्त ग्रामपंचायत स्तर आयोगाचा १ कोटी ३५ लाखावर भौतिक मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी निधी दिल्यानंतरही सरपंच आणि ग्रामसेवकाच्या अक्षम्य कर्तव्य चुकार पणामुळे ९९,६२,९१८ रुपये अखर्चित ठेवून नागरीकांना विकासापासून दूर ठेवल्या प्रकरणी गटविकास अधिकारी वैष्णवांनी ७ जून ऐन मृगनक्षत्रावर कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. तीन दिवसात आर्थिक व भौतिक अहवाल प्रत्यक्ष सादर न केल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. (ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ अनुसार) कारवाई प्रस्तावित करण्याचा आणि ग्रामसेवकाविरुद्ध सेवाशिस्तभंग प्रकरणी कारवाईचा ईशारा देण्यात आल्याने एकच धांदल उडाल्याची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळते.

लोकसंख्येच्या आधारावर लोकांना मुलभूत नागरी भौतिक सुविधा पुरवून विकासाच्या मुख्य प्रवाहात गाव यावे यासाठी शासनद्वारा बोधडी खुर्दसाठी २०२० पासून ते २०२४ मार्च या आर्थिक वर्षात १ कोटी, ३५ लाख, १५ हजार, १२९ पुरवण्यात आला. परंतू गावच्या विकासासाठी अक्षम्य उदाशिनता दाखवणार्‍या व उंठावरुन शेळ्या हाकणार्‍या ग्रामसेवकांनी फक्त ३५ लाख, ५२ हजार, २११ रुपये निधी खर्ची दाखवला. उर्वरित ९९,६२,९१८ रुपये निधी अखर्चीत ठेवला असल्याची बाब गटविकास अधिकारी वैष्णव यांच्या निदर्शनास आली. किमान नागरी मुलभूत भौतिक सुविधा हा नागरीकांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे. सरपंच आणि ग्रामसेवक विकासाला मारक ठरत असतील तर कारवाई व्हायलाच हवी.

ग्राम स्वच्छता, निर्जंतूक पाणी पुरवठा, इत्तर भौतिक व इत्तर विकासापासून बोधडी खुर्द गावाला वंचित ठेवल्याचा बाब गंभीर असल्याचा उल्लेख बजावलेल्या नोटीसीत केला असून तीन दिवसाची दिलेली मुद्दत रविवारपर्यंत आहे. १५ वा वित्त आयोग भौतिक, आर्थिक व इत्तर अहवाल अद्यावर स्वरुपात पंचायत समितीकडे विहीत मुद्दतीत सादर केलेला नाही. किमान तीन दिवसात तरी सादर करणार काय ? निधी अखर्चित ठेवण्या मागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी सरपंच व ग्रामसेवकावर केलेल्या कारवाई नंतर तरी चव्हाट्यावर येणार आहे. असा अखर्चित निधी किती गावांनी ठेवला ? हे सुद्धा समोर आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here