नवीन नांदेड l शिवसेना ऊबाठा गटाचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जोंधळे यांच्या सह समर्थकांनी शिवसेना गट नेते आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी सत्कार करून पक्षप्रवेश देण्यात आला.
नवीन नांदेड भागातील वसरणी,नावघाट परिसरातील शिवसेना ऊबाठा गटाचे पदाधिकारी असलेले संजय भाऊ जौधंळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात शिवसेना गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी त्यांचे आ.हेमंत पाटील यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
शहरातील नावघाट व वसरणी परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून वर्चस्व असलेले व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख असलेले व परिसरातील नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून ओळख असलेले संजय भाऊ जोंधळे यांची ओळख आहे, पक्ष प्रवेश वेळी शिवसेना पदाधिकारी राजेश पईतवार,मारुती पाटील धुमाळ, दशरथ कंधारे ,सखाराम शितळे ,गोविंद वट्टमवार,शिवराज गुंडाळे,राहुल जोंधळे, विजय पाटील,गुलाबराव घोरबांड ,दिनेश जोंधळे कामाजी कांजाळकर यांच्या सह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.