नांदेड| येथील भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरीकांनी व साक्षीदारांनी तातडीने भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे संपर्क साधावा व आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम. एस. माळी यांनी केले आहे.


हा गुन्हा गु.र.न 438/2024 कलम 420, 34 भा.द.वी सह कलम 3, 4, Maharastra Protection of Interest of Depositore act (MPID) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

