किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट आदिवासी बहुल भागातील नागरिकांना विविध आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रथम उपचार मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य विषयी विविध योजना राबवल्या जातात.


त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या लातूर येथील विभागीय काया कल्प पथकाने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आचानक भेट देऊन येथील स्वच्छता तसेच इतर सोयी सुविधाची प्रत्यक्षपणे पाहणी केल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी मुंडे यांनी दिली.

इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच गरोदर माता, स्तन्दन माता, यांची माहिती घेऊन डिलिव्हरी रुम व औषधी स्टोअर रुम आणि स्वच्छता या संदर्भात प्रत्यक्षपणे काया कल्प पथकाने पाहणी करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्राथमिक आरोग्य केंद्रात सोई सुविधा संदर्भात कुठल्या उनिवा असतील तर आम्हाला सांगा.

त्यामध्ये आपल्याला बदल घडून आणता येईल आणि त्यावर उपाययोजना करता येतील असे कायाकल्प पथकातील अधिकारी बोलत होते. विभागीय कायाकल्प पथकाच्या भेटी दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी मुंडे, डॉ प्रदीप शिंदे वैज्ञानिक अधिकारी मधुकर भारती, आरोग्य सहाय्यक श्रीराम कोंडेवार, नंदू चव्हाण, आरोग्य सहाय्यीका अरुणा दांडेगावकर, आरोग्य सेविका सविता कहाळेकर, यांच्यासह येथील कर्मचारी उपस्थित होते.
