नवीन नांदेड। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्या वतीने तिन नवीन कायदे १ जुलै पासून अंमलबजावणी बाबत पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जुलै रोजी जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली यावेळी पोलीस पाटील, शिक्षक, पत्रकार, नागरीक व विधार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,यांचा मार्गदर्शना खाली १ जुलै पासून भारतीय न्याय संहिता २०२३, नागरीक सुरक्षा सहिता, साक्ष अधिनियम अमलबजावणी बाबत जनजागृती अनुषंगाने बैठक आयोजित केली होती.
यात महिला व बालका विरोधी अपराध,लैगिक झळ, सामाजिक सेवा, देशद्रोह, मॉब लिचींग, साक्षीदार संरक्षण योजना, संघटीत गुन्हेगारी, किरकोळ संघटीत अपराध, हिसकावून घेणे, ऊदघोषीत अपराधी या बाबत माहिती व जनजागृती बाबत पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल,लवकुश अवनुरे, भास्कर बुधदेवार,पांडुरंग हंबर्डे,संतोष मोरे, सौ.श्रध्दा खटके, सौ. सुमन खोसडे, सौ. इंगळे, जेष्ठ नागरिक भि.ना. गायकवाड, गोपनीयन शाखेचे बालाजी दंतपल्ले, शिक्षक, शिक्षिका, व पत्रकार शाळेचे विधार्थी विधार्थीनी उपस्थित होते.