नांदेड l मोर चौक ते वाडी बुद्रुक रस्त्याच्या मागणीसाठी नागरिक कृती समितीच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मोर चौक परीसरात सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाज वाजेपर्यंत हे उपोषण सुर रहाणार असून नागरीकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .


मारे चौक ते वाडी बु. हा या भागातील मुख्य व नांदेड शहराला जोडणारा रहदारीचा रस्ता आहे. सध्या ह्या रस्त्याची खड्डे पडून चाळन झाली आहे. नामांकीत शाळा, खाजगी क्लासेस यामुळे महिला, विद्यार्थी यांची मोठी ये जा असते. खराब रस्यामुळे दररोज अनेकांचे अपघात होत आहेत. सदरील रस्ता दुरस्त करण्यात यावा या मागणीसाठी वाडी बु नागरीक कृती समितीच्या वतीने सुमारे तीन हजार सहयांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते.


त्यानंतर पुन्हा एकदा निवेदन देऊनही प्रशासनाने लोक भावनेला केराची टोपली दाखवली. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांच्या वतीने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा यासाठी आज सोमवारी एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे. यानंतरही हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे, सचिव विजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष संकेत जमदाडे,उपाध्यक्ष वसंत कऱ्हाळे, नंदकुमार बनसोडे, किरन नाईक, बी.बी एंगडे यांनी दिली.
