किनवट, परमेश्वर पेशवे। शहरातील बाबारमजान गल्ली येथे नळांना पाणीच येत नसतांना न.प.च्या ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा केला जाणारे टेंकर पण या वार्डात येत नसून टँकर कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संगणमताने केला जात असुन आठवड्यातून दोनदा टँकर येतो तर कधी कधी आठवड्यातून एकदाच येतो बाकी वार्डात दररोज टँकर चालू असुन बाबारमजान गल्लीतील जनतेचे म्हणणे आहे. अधिच नळाला पाणी येत नसतांना टँकरद्वारे नियोजीत पाणीपुरवठा करणारे न.पा. कर्मचारी यांना सांगल्यावरही ते टँकर पाठवत नाहीत नळ ही सोडत नाहीत.
नवीन पाईपलाईन सुद्धा झालेली आहे ते पण पाणी आतापर्यंत चालू झाले नाही बाबा रमजान गल्ली येथील रहिवासी असलेले सय्यद अजहर यांनी इतर नागरिकांनी लेखी निवेदन न.प. चे मुख्याधीकरी यांना येथील रहिवाशांनी निवेदन देऊन तक्रार सुद्धा केलेली आहे. हर एक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा काम नगरपालिकेचे आहे. या सर्व बाबींची दखल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तात्काळ घ्यावी नसता घागर मोर्चा काढण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.