नांदेड| नांदेड शहरात उद्या दिनांक १७ फेब्रुवारी रोजी प्रगतीनगर तरोडा येथे नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व महारुद्र हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा होणार आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाची रूपरेषा पुढीप्रमाणे आहे. आज दिनांक १६-०२-२०२५ रविवार रोजी वेळ स. ८ वाजता कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे. उद्या दिनांक १७-०२-२०२५ सोमवार रोजी स. ६ ते १२ या वेळी सर्व मंडल पूजन व होमहवन नर्मदेश्वर व गणपती आणि स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन होणार आहे. श्री श्री १०८ श्री महंत समगीर महाराज गुरु जयगिरी महाराज श्री दत्त मठ संस्थान, नांदगाव,गुरुवर्य श्री ष. ब्र. १०८ गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मुर्तीस्थापना (मठ संस्थान गिरगाव ता. वसमत, जि. हिंगोली) यांची या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

किर्तनकार ह. भ. प. रितेश महाराज पावडे (पावडेवाडीकर) यांचे कीर्तन १२ ते २ पर्यंत किर्तन प्रवचन होईल. आ.बालाजीराव कल्याणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन भगवान स्वामी महाराज (पुजारी लक्ष्मी मंदिर देशमुखनगरी),विनायक स्वामी महाराज,अशोकराव देशमुख (कामगार संघटना जिलाअध्यक्ष) यांनी केले आहे.
