नांदेड/हुजूर् साहिब। सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नानक-साई फाऊंडेशनची ‘मजबूत भाईचारा‘ हि संकल्पना पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंघ मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपालकौर जी मान यांनी व्यक्त केले.
तख्त सचखंड हुजूर् साहिब गुरुद्वारा दर्शना करिता श्रीमती हरपालकौर जी मान नांदेड येथे आलेल्या आहेत. हरपालकौर मान यांनी गुरुद्वारा दर्शन घेतले असून काल त्यांनी गुरुद्वारा चे प्रमुख पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ यांची यांनी भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. गुरुद्वाराच्या निष्काम सेवेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. येथील गुरुद्वारा लंगर साहिब चे मुखी संत बाबा नरेंद्रसिंग जी तथा संत बाबा बलविंदरसिंग जी यांच्या अखंड कार सेवेचे श्रीमती हरपाल कौर यांनी कौतुक केले. दरम्यान सहयोग lनगर (नांदेड) येथे नानक साई फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या विशेष स्वागत सोहळ्यात त्यांनी उपस्थिती लावली.
नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे आणि सौ प्रफुल्लाताई बोकारे यांच्या हस्ते श्रीमती हरपालकौर जी मान, त्यांची कन्या बिबी मनप्रीतकौर व जावई सरदार परलोक सिंघ यांचा पारिवारिक सत्कार करण्यात आला. यावेळी माधवराव पटणे, माजी उपहापौर सतीश देशमुख तरोडेकर, प्रा उत्तमराव बोकारे, जी नागय्या,श्रेयस कुमार बोकारे, सौ प्रेमाबाई नागय्या,ज्येष्ठ संपादक एन.एम.बेंद्रीकर,दिगंबरराव क्षीरसागर, डॉ गजानन देवकर, बालाजी सूर्यवंशी,साहेबराव गायकवाड,गंगाधर पांचाळ, गोपाळ पाटील (सांगली), नंदिनी चौधरी, दीपकसिंह चंदेल,बेलादेवी चंदेल,निर्मला भोसकर, विनायक पाथरकर, मीनाक्षी पाटील, सोनाली देशमुख , डॉ.विद्या पाटील,कीर्ती सुसतरवार ,अनुराधा खरगे,जयश्री देवसरकर, धनंजय उमरीकर,स्वप्नील बेंद्रीकर,अतुल देवसरकर हे प्रमुख उपस्थित होते.
पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली चळवळ म्हणजे नानक साई फाउंडेशन.. नानक साई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पंजाब व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये बंधुभाव निर्माण करणे आणि तिथला सेवाभाव आजमावणे, सांस्कृतिक देवाघेवाण करने यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. यासाठी भगवंत मान यांच्या नेतृ्वाखालील पंजाब सरकार चे नेहमीच सहकार्य असेल असा विश्वास हरपाल कौर मान यांनी व्यक्त केला. संत नामदेव महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या घुमान सद्भावना यात्रेला आम्ही खंबीर साथ देतो असे त्या म्हणाल्या