हिमायतनगर/नांदेड| मौजे पिंपळगाव ता हदगाव येथे १०८ कुंडी विश्र्वशांती दत्तयाग महायज्ञात आज दि १२/०३/२५ रोजी सकाळी लोकनेते आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी सपत्नीक महायज्ञात सहभाग घेतला. सातव्या दिवशी दिनांक १३ मार्च रोजी वृंदावन (रेवासा) शि.भ.प.राजेद्रदास देवाचार्यजी महाराज यांच्या मधूर वाणितून शिवमहापुराण कथा समाप्ती कार्यक्रम आहे.


दत्त मंदिर पिंपळगाव मठाधिपती प.पू. व्यंकटस्वामी महाराज यांच्या या भव्य कार्यक्रमासाठी अनेक संत, महंत, नागा साधू, साध्वी, किर्तनकार,अनेक आखाड्याचे प्रमुख मठाधिपती, अनेक मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, सर्व क्षेत्रातील भाविक भक्त मंडळी, महीला मंडळी, शेतकरी, युवकांनी, स्वयंसेवक, सेवेकरी भक्त मंडळी, नांदेड जिल्हा, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी, परराज्यातील अनेक मान्यवर मंडळी, महंत, संत, कथा -किर्तनकार , श्री राधेकिसनजी महाराज, बागेश्वर महाराज, तथा अनेक भाविकांनी मोठी उपस्थिती लावली.

हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ 84 आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाची, जबाबदारी व स्वतः उपस्थिति लावून या भव्य कार्यक्रमासाठी मठाधिपती व्यंकटस्वामी महाराज यांच्या सोबत कर्मचारी सर्व तालुक्यांमध्यील गावकरी मंडळी, उपस्थित आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर आज दिनांक १२ रोजी त्यांनी सपत्नीक महायज्ञात सहभाग घेतला आहे.
