हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील महावितरण कंपनीकडून होत असलेली विकास कामे ही बोगस व निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड सातत्याने होत आहे. अश्यातच हिमायतनगर ते पळसपूर रोड वरील विद्युत पोल उभारणीच्या कामात जुन्या पोलला रंगरंगोटी करून ते पोल उभारण्यात येत असल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
हिमायतनगर ते पळसपूर रस्त्यावर असलेल्या मो.सलीम मो.यासिन यांच्या शेताजवळ महावितरण कंपनीचे पोल उभारणीचे काम चालू आहे. त्यासाठी हिमायतनगर शहरानजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ नव्या पोलमध्ये काही जुने पोल ठेऊन त्याला रंगून ते उभे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी तथा समाजीक कार्यकर्ता शेख सलीम यांनी जायमोक्यावर जावून उपरोक्त कामाची माहिती घेण्यासाठी गेले असता, तिथे जिर्ण झालेले लोखंडी पोलाच रंग लावले जात होते. हे विचारल्यास पोलचे काम करणाऱ्या ठेकेदारची माणसे तिथून निघून गेली.
तेच पोल हिमायतनगर ते पळसपूर इथे उभारण्यात येणार असल्याचे कळाले. सदर माहीती प्राप्त होताच शेतकरी शेख सलीम यांनी सदरचे काम थांबविण्याची मागणी केली. याबाबत पत्रकारानं माहिती देऊन त्यांनी सांगितले कि, १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिनाच्या नंतर महावितरणच्या वरिष्ठांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मो.सलीम मो.यासिन यांनी सांगीतले. तसेच हिमायतनगर शहरात देखील नगरपंचायत अंतर्गत होत असलेली कामे मोठ्या प्रमाणात नियमाला बगल देऊन केली जात असल्याचे सांगून याबाबत देखील जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले आहे.