नांदेड। छत्रपती संभाजी नगर येथील फेस क्लिनिक अँड रिसर्च सेंटर येथे दिनांक 29 जून 2024 व दिनांक 30 जून 2024 अशी शनिवार व रविवार दोन दिवशीय दंतरोपण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत नवीन दंतवैद्यांना डेंटल इम्प्लांट बद्दलचे प्रशिक्षण तसेच त्यांचे प्रात्यक्षिक डेमाँस्टेशन आणि प्रत्यक्ष रुग्णावर दंत रोपण करण्यात आले यामध्ये चार शस्त्रक्रिया, वैयक्तिक प्रात्यक्षिक तसेच 12 लेक्चर घेणात आले.
दंतरोपण हे आधुनिक उपचार पद्धती असल्याने दंतवैद्य शास्त्रातील बॅचलर ऑफ डेंटल सर्जन म्हणजेच बीडीएस ही डिग्री कोर्समध्ये याचे माहिती व प्रशिक्षण फार कमी प्रमाणात असते त्याकरिता एमडीएस म्हणजेच मास्टर ऑफ डेंटल सर्जन या पदव्युत्तर कोर्सची अत्यावश्यकता असते. पंरतु सर्वच डॉक्टर हे उच्च पदवीधर शिक्षण घेऊ शकत नाही. त्याकरिता ही दोन दिवशीय उच्च प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजनामुळे नविन दंत वैद्यकांना अचूक प्रशिक्षण व प्रात्यक्षिक बघायला मिळाल्यामुळे त्यांना दंत रोपन करण्यासाठी आत्मविश्वास वाढतो व ज्ञानात भर पडते त्यामुळे ते अद्यावत व अत्याधुनिक पद्धतीने आपल्या दैनंदिन सेवेमध्ये रुग्णांवर उपचार करू शकतात.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये, डॉ. सिमीत शहा, डॉ. गोविद चांगुले, डॉ. सुजाता चांगुले, डॉ.अमोल डोईफोडे ,डॉ. विशाल पाटील, डॉ अरुण बालकुंदे, , डॉ. चेतन झंवर, डॉ. पुजा मुळे व डॉ. विनायक कनकदंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिरासाठी शिबीरातील मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. सिमीत शहा हे प्रसिद्ध दंतरोपण तज्ञ यांचे मार्गदर्शन हे होते ते मागील ३० वर्ष पेक्षा जास्त कालावधीपासून दंतरोपण करतात तसेच या शिबिराचे आयोजन व संचालक डॉ गोविंद व डॉ सुजाता चांगुले यांनी हे प्रशिक्षण आयोजन केले होते.