हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर संपन्न (Hundreds of youth participated in blood donation on the occasion of Shiv Janmatsavam in Himayatnagar) झाले असून, सायंकाळपर्यंत १०० हुन अधिक युवकांनी रक्तदान केले होते. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, दिनांक ०४ मार्च रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर (वाढोणा) शहरात विविध उपक्रमांनी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जात आहे. जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात दिनांक 19 फेब्रुवारी बुधवारी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी १२ वाजता करण्यात आली. सायंकाळपर्यंत १०० हुन अधिक युवकांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे.

यावेळी श्रीपरमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, डॉ.राजेंद्र वानखेडे, डॉ गणेश कदम, डॉ आनंद माने, डॉ.दिलीप माने, डॉ.दिगंबर वानखेडे, डॉ.प्रसन्न रावते, डॉ.भिसे, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उबाठा शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे, भाजप जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, विकास पाटील देवसरकर, मायंबा होळकर, मारोती लुम्दे, उदय देशपांडे, राम नरवाडे, प्रकाश हंपोलकर, वामनवराव मिराशे, श्रीकांत सूर्यवंशी, संजय माने, गजानन हरडपकर, विलास वानखेडे, लक्ष्मण डांगे, मुन्ना शिंदे, बंडू अगुलवार, श्रीदत्त पाटील सोनारीकर, बालाजी ढोणे, वैभव डांगे, जितू सेवनकर, पंडित ढोणे, अरविंद वानखेडे, किरण माने, गणेश इंगळे, गजानन वानखेडे, शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील नागरिक, युवक व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा सायंकाळी 4 ते 10 या वेळात काढण्यात येणार आहे. या शोभा यात्रेत शहरासह ग्रामीण भागातील सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन गोविंद शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या युवकांनी केले आहे. तसेच हिमायतनगर बस स्टँड परिसरात दिनांक 4 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 ते 9 वाजेच्या दरम्यान ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरी कीर्तन होणार आहे. या कीर्तन सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होऊन कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती हिमायतनगरच्या वतीने करण्यात आलं आहे.
