नायगाव। तालुकातील मौजे बैठक बिलोली शिवारात येथील शेतकरी बाबुराव भीमराव नकाते, रामराव नकाते, राहुल नकाते, यांच्या पाच एकरवर ऊस जळून खाक झाल्याने ही आग 18/ 12 2024 रोजी लागली होती अद्याप कारखानदारक शेतकीय अधिकारी ऊस नेला नाही संबंधित तहसिलदार, विद्युत वितरण कंपनी सह प्रशासनाने शेतकऱ्यांचा मावेजा नुकसान भरपाई दिली नसल्याने याबाबत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा गजानन पाटील चव्हाण यांनी दिला आहे.
ज्यांचं जळतंय त्यालाच कळतंय अशी खरी असलेली मन खरीच ठरते, जगाला साखर देणारा शेतकऱ्यांना वेळेवर भाकर मिळत नाही कारण जळालेला उसाचे वजन हलके हलके झाले आहेत तरीही झोपेचे सोंग का संबंधित वर्ग घेत आहेत. झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल गजानन चव्हाण यांनी केला आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या कारखानदार किमान 4800 ते 5000 रुपयांनी प्रति टन खरेदी केले पाहिजे अशी ही त्यांची मागणी केली .
कारण विदर्भ, कोकण, पश्चिम, महाराष्ट्र या विभागातील कारखानदार यांना भाव का परवडणारे आहे.
आणि अपणास का नाही व संबंधित प्रशासन आणि कारखानदारकांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या उसाला भाव आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई नाही मिळाल्यास संबंधित कारखानदार आणि संबंधित प्रशासनावर शेतकर्यांना आंदोलन छेडणार असल्याचे मत नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पा चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले, यावेळी उपस्थित शेतकरी पुत्र रणजीत पवार, उमेश नकाते, विजय पवार,पवन भुताळे, सुधाकर पवार, अनिल पवार, शुभम पवार, प्रवीण मामेडवार सह शेतकरी बांधव उपस्थित होते.