हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायतीसमोर दिनांक २४ ते ३० पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन केल्यानंतर आंदोलन तीव्र होऊ लागल्याने नगरपंचायतीच्या प्रशासनाने लेखी अश्वांसन देऊन कोपराला गुल लावण्याचे काम केले आहे. यास दहा दिवस लोटले असताना उर्वरीत प्रश्न व मागण्या पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आता चक्क आंदोलनकर्ते तहसीलदार अध्यक्ष असलेल्या श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट समोर शासनाच्या विरोधात दिनांक १६ रोजी बेमुदत थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले आहे. यावरही मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत हक्काच्या मालकी प्रमाणपत्रापासून वंचित असलेले गोर गरीब नागरिक तयारीत आहेत.


हिमायतनगर शहर ते तालुक्याचे ठिकाण असून, ग्रामपंचायतीच्या काळात म्हणजे अंदाजे ७० वर्षापासुन तत्कालीन सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी दिलेल्या जागेवर शहरातील बेघर, गोरगरीब मांगास वर्गातील लोक वास्तव्य करतात. त्या जागेवर कच्चे घर उभारून नगरपंचायतला घर भाडे, पाणी पट्टी, व ईतर कर अदा करतात. मात्र त्या घराचा सर्वे करून त्याना नमुना नं. ४३ अ मालकी हक्क प्रमाण पत्र दिल्या गेले नसल्याने शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलाचा लाभ मिळत नाही. गावठानातील सरकारी जागेवर बेघराने मातीचे घर उभे केले त्या घराचा नगरपंचायत घरभाडे व ईतर कर वसुल करते. घर नमुना नंबर ४३ देण्यास टाळा टाळा करतात. त्यामुळे गरजूना हक्काचे घर मिळत नाही ही शरमेची बाब आहे.


मनरेगा अंतर्गत शहर व तालुक्यात कामे काढुन मजुरदारांना कामे द्या. मागेल त्याला जॉब कार्डाचे वाटप करून योजनेला लोकाभिमुख करून यंत्राने कामे करणे बंद करा. शेती क्षेत्रात पेरणी ते कापणी रोजगार हामी योजने मार्फत कामे काढा. वस्ती वाढ योजने अंतर्गत बे घराचा सर्वे करा त्यांना जागा व घरकुलाचा लाभ द्या. हिमायतनगर शहर व तालुक्यातील हजारो निराधार व वृध्द भुमिहीन दिव्यांग परीतकत्या घटस्पोटीत महिला यांना आनुदान मिळण्यासाठी (२१००० हजार मुळ व शेती) ह्या अटीमुळे आपात्र केले जाते. हा त्यांच्यावर आन्याय असून, जाचक अटी रद करा व लाडक्या बहिण योजनेच्या अटी शर्ती अनुसार आनुदास पात्र करा. महागाई निर्देशनानुसार ६००० हजार रूपये वाढ करा व महिण्याच्या ७ तारखेला अनुदान वाटप करा. वय वर्ष ६० असण्याऱ्या प्रत्येक लाभात्यास १०००० हजार रूपये पेंशन था व त्यांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विरूगंळा (विसावा) केंद्र उभारा, स्वस्त धान्य योजने मधील ए. पी.एल. व शेतकरी लाभ धारक कार्डावर पुर्वी प्रमाणे धान्या वाटप करा. शिदा किट व पैसे वाटप करणे बंद करा, पैसे नको धान्य तांदुळ, गहू द्या.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आनंदच झाला मात्र पट संख्येच्या नावा खाली मराठी प्राथमिक शाळा बंद करण्याचा सपाटा सुरू आहे. प्राथमिक शाळा नगरपंचायत विभागा कडुन चालविण्यात याव्यात. गोर गरिब मराठी मुलांना शिकण्याचा अधिकार द्या. हिमायतनगर येथे एम.आय. डी.सी. औधोगिक वसाहत निर्माण करा व तरूणाना रोजगार द्या. सन २०२३ मध्ये ई. पेरा व पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्याना सरसगट ५००० हजार रूपये द्या. महसुलच्या तलाठ्याकडुन शेतकऱ्याच्या सात बारावर पुर्वी प्रमाणे पेरे मांडून द्या. सन २०२३-२४ मध्ये अतिवृष्टी झाली महसुल विभागाने आनेवारी फुगुन दाखवली ती ५० च्या खाली आना व ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी करा व शेतीमालाला हमी भावाने सरकारी खरेदी केंद्र सुरू करा. अश्या मागण्या घेऊन लोकविकास समन्वय संघर्ष समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सी.टु) कामगार संघटनेच्या सयुक्त विद्यमाने दि. २४/०९/२०२४ पासुन नगरपंचायत समोर शेतकरी कामगार निराधाराच्या ज्वलंत प्रश्नावरती बेमुदत धरणे आंदोलन केले.

सातव्या दिवशी आंदोलन तीव्र होऊ लागल्याने काही मागण्यावर नगर पंचायत प्रशासनाने लेखी पत्र काढून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सरकारी जागेवरील नमुना नं.४३ मालकी हक्क प्रश्नासाठी प्रभारी मुख्य आधिकारी, आमदार महोदयांनी दि. ०१ ऑक्टोबर २०२४ आंदोलका बैठक घेऊन मालकी हक्क देण्याबाबत सर्वे करून तोडगा काढु असे आस्वासन दिले होते. त्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगीत केले गेले यास दहा दिवसा लोटल्या नंतरही प्रशासनाकडुन कोणतेही कार्यवाही अथवा सर्वे झाला नाही. त्यामुळे स्थगीत केलेले आंदोलन आता तहसिलदार तथा परमेश्वर मंदिराचे अध्यक्ष यांच्या कार्यालय समोरील मैदानात दि. १६ पासून आंदोलन करण्यात येईल असे एका निवेदनाद्वारे कळवण्यात आले. या प्रलंबीत मागण्याचे लेखी अश्वासन व पाठ पुरावा करण्याचे प्रभारी मुख्य आधिकारी यांनी दिले. पण कोणतेही शासकीय कार्यवाही झाली नाही ना कोणते प्रश्न मार्गी लागले नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते तहसीलदार अध्यक्ष असलेल्या श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट समोर शासनाच्या विरोधात दिनांक १६ रोजी बेमुदत थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.
यावरही मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत हक्काच्या मालकी प्रमाणपत्रापासून आणि विविध योजनेपासून वंचित असलेले गोर गरीब नागरिक आहेत. या निवेदनावर कॉ. दिगांबर काळे, अध्यक्ष लो.वि.स. स.हि. सं.स, गणेश रच्चेवार, ता. सचिव लो.वि.स.स.हि.सं.स, जयश्रीबाई बिजेवार ता. उपाध्यक्ष लो.वि.स.स.हि. सं.स, कांताबाई बनसोडे, अध्यक्ष म.न.प.यु.सि.टू. नविन मादसवार, परमेश्वर सुर्यवंशी, वैशाली जलेवार, गंगाधर गायके, धुरपतबाई तुंगेवाड, रेणुकाबाई माने, जाधव पोशटी संभा आदींचं स्वाक्षऱ्या आहेत.