नवीन नांदेड l आ स्क पब्लिक स्कूल हडको यांच्या वती वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांचे अनेक खाद्यपदार्थ तयार करून विक्री केली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त 30 जानेवारी रोजी आस्क पब्लिक स्कूल हडको यांच्या वतीने आनंद नगरी आयोजित करण्यात आली होते.


यावेळी आंनद नगरीचे उद्घाटन दैवशिला नितीन वाघमारे, ज्योती कोंडलवार,अनुष्का कोतावार संचालक,व पालक मिरा कपाळे,मनिषा कपाळे, मोनिका पवार कविता अबिलवादे,शारदा काबरा,यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर व छायाचित्रकार सारंग नेरलकर यांच्या सह संस्थेचे संस्था चालक संतोष कोतावार,शाळेतील शिक्षक वृंद प्रिती नलबलवार, वैष्णवी अडाव,मयुरी पोगलवाड,पद्मा सुर्यवंशी, पल्लवी शिंदे, कल्पना सोनकांबळे, ,आरती गजभारे , अनुराधा जाधव,फरीन शेख,अर्चना, अस्मिता,
रफत ,हिना यांनी परिश्रम घेतले, यावेळी जवळपास 16 स्टाॅलवर पाणी पुरी,वडापाव, पावभाजी, ढोकळा चने यासह अनेक पदार्थ तयार करून विक्री केली.लहान लहान विध्यार्थ्यांनी विकत घेऊन आनंद नगरीचा आनंद लुटला व केलेल्या अन्न पदार्थाचे अनेक पालकांनी कौतुक केले.
