नवीन नांदेड | सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. मिर्झा बेग यांनी कार्यालयीन कामात सुसूत्रता आणुन प्रलंबित असलेल्या अनेक विभागातील संचिका निकाली काढुन दैनंदिन मालमत्ता व पाणीपटी वसुली साठी करनिरीक्षक यांच्या नियोजन करून मालमत्ता धारक यांच्या कडे वसुली साठी पाठवुन मालमत्ता करात वसुली मध्ये वाढ केली असून स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुख्य रस्त्यावर अंतर्गत रस्त्यांवरील केरकचरा पाहणी करून संबंधित विभागाच्या स्वच्छता निरीक्षक यांना दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या दहा दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा फरतुल्ला बेग यांची अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक केली होती, प्रारंभी प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा, मालमत्ता व नळपटी वसुली यांच्या आढावा घेऊन विविध विभागांतील कामांचा आढावा घेतला व करनिरीक्षक , वसुली लिपीक यांच्यी बैठक घेऊन दैनंदिन थकबाकी मालमत्ता धारकयांची थकबाकी यादी काढुन संबंधित मालमत्ता धारकांना वसुली साठी आग्रह करून कर भरण्यासाठी नियोजन केले व दैनंदिन वसुली मात्र वाढ केली तर मालमत्ता नव्याने क्रमांक देण्यासाठी असलेल्या शैकडो प्रलंबित संचिका निकाली काढल्या,तर नाव परिवर्तन विभागातील जवळपास सर्वच संचिका निकाली काढण्यात आल्या आहेत.
कार्यालयीन कर्मचारी वेळेवर न येणे , नागरीकांच्या तक्रारी यासह प्रलंबित असलेल्या अनेक कामांचा निपटारा सहाय्यक आयुक्त डॉ.बेग यांनी केल्यामुळे कार्यालयीन कामात सुसूत्रता आणुन मालमत्ता वसुली साठी प्राधान्य देऊन दैनंदिन चार लाख रुपये मालमत्ता वसुली केली आहे,तर मोठया थकबाकी दारांना सुचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.