किनवट, परमेश्वर पेशवे| वेग-वेगळ्या कलाकृतींनी नटलेल्या क्लस्टर लेवल ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव २०२४’ हा महोत्सव १३ ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय शैक्षणिक संस्था तसेच आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पाचव्या ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव २०२४’ चे कार्यक्रमाचे उद्घाटन किनवटचे मा. आ.भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आनंद मच्छेवार नगराध्यक्ष किनवट , बालाजी आल्लेवार. उपसभापती, कपिल करेवाड. काशिनाथ शिंदे, गंगाराम गड्डमवाड, परमेश्वर पेशवे, गौतम कांबळे, ईश्वर जाधव, तुकाराम बोनगीर. दिगांबंर आडे. तसेच विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळवा तसेच त्यांना योग्य व्यासपीठ मिळावं या उद्देशानं आयोजित केलेला हा महोत्सव अतिशय प्रशंसनीय आहे आणि असे कार्यक्रम सतत आयोजित व्हावेत असं मत उद्घाटक आ. भिमराव केराम यांनी बोलतांना व्यक्त केलं.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देश्याने हा महोत्सव दरवर्षी क्लस्टर, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जातो. या वर्षीचा क्लस्टर स्तरीय आयोजनाचा मान ‘ किंवा तालुक्यातील सहस्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल या शाळेला मिळाला आणि सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम व्यवस्थितपणे यशस्वी होऊन योग्य स्पर्धकांची निवड पुढील स्पर्धेसाठी करण्यात आली. या महोत्सवामध्ये गटातील सहस्रकुंड, बोरगाव बाजार, धारणी, चिखलदरा, खैरी परसोडा व बोटोणी या एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे परीक्षण परिसरातील त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ मान्यवर यांच्या कडून करण्यात आले अशी माहिती महोत्सवाच्या क्लस्टर ऑर्गनाइजर श्रीमती राधिका गोलटकर प्राचार्या EMRS सहस्त्रकुंड यांनी दिली. या महोत्सवाचे प्रमुख समन्वयक म्हणून सुरेश इंगळे टीजीटी इंग्लिश यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी या संपूर्ण महोत्सवाचे नियोजन तसेच व्यवस्थापन राहुल सावंत कनिष्ट लिपिक यांच्या समवेत इतर शैक्षणिक व गैर-शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने श्रीमती राधिका गोलटकर प्राचार्या यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, मा. आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक श्रीमती नयना गुंडे मॅडम, जितेंद्र एन चौधरी एटीसी अमरावती, श्रीमती मेघना कावली प्रकल्प अधिकारी ITDP किनवट, श्रीमती सोनवणे मॅडम, श्रीमती दाभाडे मॅडम, कलाथीनाथंन सर, शेळके सहा. प्रकल्प अधिकारी या सर्वांचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले. अध्यक्षीय भाषणात बोलतांना क्लस्टर ऑर्गनाइजर श्रीमती राधिका गोलटकर प्राचार्या EMRS सहस्त्रकुंड यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी क्लस्टर ऑर्गनाइजर श्रीमती राधिका गोलटकर प्राचार्या तसेच संपूर्ण शाळेच अभिनंदन केले.
या महोत्सवामध्ये शाळेतील श्रीमती ममता जाधव, श्री उत्तरेश्वर निर्मल, कु. दीक्षा सिंघ, श्रीमती वर्षा वाघमारे, कु. बरीरा मंताशा, श्री प्रिन्स मान, विशाल भारद्वाज, सोनु कुमार, सुखविन्दर सिंह, महादेव शिंदे, श्रीमती सुमन, श्रीमती राखी सिंघल, ज्ञानेश्वर डांगे, दिव्येंद्रू देव, श्रीमती स्नेहा वहाने, सतेन्द्र कुमार, अमन वर्मा, सुमित कुमार, रूपल मॅडम, लथाड सर, कनाके सर, ढोले सर, तसेच EMRS बोटोणीच्या कर्मचाऱ्यांनी यथोचित मदत केली. स्वयंसहायक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विविध जबाबदऱ्या पार पाडून महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.