नांदेड| बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ आज नांदेड शहरात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात लाखो बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. उन्हाच्या तडाख्यातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम राहावा म्हणून बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने मोफत मिनरल पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.


शहरातील आयटीआयजवळ महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर आणि मोर्चाच्या मार्गावरील विविध ठिकाणी एक लाखांहून अधिक मिनरल पाणी बाटल्या वाटप करण्यात आल्या. याशिवाय उन्हाच्या झळांपासून आंदोलनकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून भव्य मंडपांची व्यवस्था देखील करण्यात आली होती.


या स्तुत्य उपक्रमात बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, सुवर्णा वाघमारे, वैशाली लोहाळे, सूर्यकांता धोत्रे, मीना चावरे, वंदना दामोधर, वर्षा कसबे, मयुरी व्यवहारे, अनघा जोंधळे, प्रतिमा गायकवाड, त्रिशला नरवाडे, संजय नरवाडे, बाबूराव कसबे, पत्रकार दत्ताहरी धोत्रे, डॉ. राम वाघमारे, मिलिंद चावरे, किशन फोले, भालचंद्र जोधळे, अशोक दामोधर, रवी लोहाळे, नंदकुमार बनसोडे, मिलिंद व्यवहारे, भगवान गायकवाड, किशोर आटकोरे आणि चंद्रमुणी कांबळे आदी कार्यकर्त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला.

या सामाजिक उपक्रमास पूज्य भंते विनय बोधी, पूज्य भंते पय्या बोधी, आंबेडकर चळवळीचे नेते सुरेश गायकवाड, प्रफुल्ल सावंत, माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे, समाजकल्याण अधिकारी अशोक गोडबोले, सुभाष काटकांबळे आदींनी भेट दिली. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या लाखो अनुयायांसाठी हा मोफत मिनरल पाणी वाटप उपक्रम मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरला आहे. बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनने घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
