नवीन नांदेड l स्वामी समर्थ केंद्र सिडको येथे दत्तजयंती निमित्ताने आयोजित अखंड दतनाम जप यज्ञ सोहळ्यास भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी भेट देऊन दर्शन घेऊन महाआरती केली यावेळी केंद्राच्या वतीनेभाजपा अनुसूचित जाती जमाती नांदेड शहर महानगर अध्यक्ष तथा सेवेकरी नवनाथ कांबळे यांनी स्वागत केले.
स्वामी समर्थ केंद्र सिडको येथे श्रीदत जयंती निमित्ताने 9ते 16डिसेबंर सप्ताह आयोजित करण्यात आला होता, यावेळी सप्ताह अंतर्गत चौथ्या दिवशी भाजपाचे संघटन मंत्री संजय कौडगे यांनी मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले यावेळी त्यांचा हस्ते महाआरती करण्यात आली, सेवेकरी नवनाथ कांबळे व विनायक आकुरके यांनी स्वागत करून सत्कार केला.