नांदेड/भोकर| राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व गुटखा एकुण किंमत 45,000/- रुपयाचा 2) एक काळया रंगाचा अॅपे अॅटो ज्याचा पासिंग क्र. MH-26-AC-2001 असा असलेला जु.वा. कि.अं. 2,00,000/- रुपये असा एकुण 2,45,000/- रुपयाचा मुद्येमाल अवैद्यरित्या विक्री करण्यासाठी जाताना भोकर पोलिसांनी कार्यवाही करून मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे गुटखा माफ़ियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत पो.स्टे. हधीतील अवैध गुटखा विक्रो व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अजित कुंभार पोलीस निरीक्षक, भोकर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सोबतचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने परिणामकारक पेट्रोलिंग लावण्यात आली होती. पेट्रोलिंग दरम्यान दिनांक 20/12/2024 रोजी बसस्थानक भोकर समोरील रोडवर एक अॅपे अॅटो ज्याचा पासिंग क्र. MH-26-AC-2001 मिळुन आल्याने पोलीस स्टाफसह त्याची पाहणी केली.
यावेळी त्यात एका खाकी रंगाच्या चौकोनी बॉक्समध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला, गुटखा रजनीगंधा पान मसालाचे 90 पाकिट कि.अं. 45,000/- रुपये व अॅपे अॅटो ज्याचा पासिंग क्र. MH-26-AC-2001 कि.अं. 2,00,000/- असा एकुण 2,45,000/- रुपयाचा मुद्देमाल जवळ बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असताना शेख हैदरसाब शेख दादेसाब वय 30 वर्ष, व्यवसाय चालक रा. लगळ्द ता. भोकर हा मिळुन आला आहे.
सदर मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस अटक करण्यात आले आहे. त्यावरून गु.र.नं. 497/2024 कलम 26 (2), 27, 23, 30(2) (a), 59 (iv) अन्न सुरक्षा मानके कायदा व सहकलम 123,223,274 भारतीय न्याय संहिता अंतर्गत फिर्यादी गुरुदास नारायणराव आरेवार वय 37 वर्षे, व्यवसाय नौकरी पो.कॉ.ब.नं. 3162 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि शैलेंद्र औटे हे करीत आहेत.
हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक साहेब, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, श्रीमती शफकत आमना, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री. अजित कुंभार, सपोनि श्री. शैलेंद्र औटे, पोउपनि / सुरेश जाधव, पोलीस अंमलदार पोकों/ 3162 गुरुदास आरेवार, पोकों 440 परमेश्वर गाडेकर, पोकों / 815 परमेश्वर कळणे यांनी केली आहे.