नवीन नांदेड| सिडको येथील श्री भगवान बालाजी मंदिराच्या ३४ वा दसरा ब्रह्मोत्सवानिमित्त ३ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान दैनंदिन होम हवन विधी ,अभिषेक,कलशाभिषेक, वसंत व कल्याण उत्सव आदी कार्यक्रमासह रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी करण्यात येत असून रंगरंगोटी सह मंदिरावर व कमान प्रवेशद्वार येथे रोषणाई करण्यात येत आहे.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री भगवान बालाजीचा ब्रह्मोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला असून ३ ते १२ऑक्टोंबर दरम्यान आचार्य पंडित श्री पंचरात्रगम विद्वावान सुवर्ण कंकनालकृत श्रृंगारम रंगानाथाचार्य यज्ञाचार्य,जिवागुडा व मंदिर पुजारी श्री.दिव्यांशु महाराज यांच्या आचार्यतत्वाने सकाळी अभिषेक, नामपाठ, होम हवन विधीपूर्वक संपन्न होणार आहे. दररोज वाहनातून श्री भगवान बालाजी उत्सव मूर्तीची मिरवणूक सकाळी व सायंकाळी निघणार आहे.


सोमवारी दि ३ऑक्टोंबर रोजी सुप्रभात,अभिषेक,बालभोग,प्रबंध पाठ,व सायंकाळी नियोजित धार्मिक विधी तर ४ रोजी घ्वजाहारोहण व बली प्रदान, ५ रोजी प्रबंध पाठ होणार, सुर्यप्रभा वाहन, ६ रोजी प्रबंध पाठ, हवण,वसंत उत्सव,७ सुप्रभात, अश्व घोडा वाहन सरस्वती पुजा, सरस्वती भजन मंडळ महिला दुपारी १ ते ४ ,८ रोजी होणार, सरस्वती पूजन,९ रोजी होणार, लक्ष्मी पद्मावती सहित व्यंकटेश भगवान १०८ उत्सव अभिषेक,१० रोजी सुप्रभात हवण आरती,११ रोजी हवण, आरती,रथ प्रतिष्ठा, १२ रोजी विजया दशमी दसरा निमित्ताने सुप्रभात अभिषेक, बालभोग ,आरती, सर्व दर्शन हवण, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

भगवान बालाजी उत्सव मुर्तीची भव्य मिरवणूक ११ आक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता रथ वाहनातून काढण्यात येणार आहे. विजयादशमी दसरा निमित्त १२ ऑक्टोंबर रोजी अभिषेकानंतर भक्तांना भगवान बालाजीचे दर्शन देण्यात येणार आहे. या ब्रम्होत्सव सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी व्हावे व आजीव सभासद सेवा नोंदणी २१०० रुपये ठेवण्यात आली असून मंदिराच्या विकासासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे व दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष साहेबराव जाधव , कोषाध्यक्ष बाबूराव बिराजदार, सचिव व्यंकटराव हाडोळे,व विश्वस्त मंडळ तुकाराम नांदेडकर, डॉ.नरेश रायेवार, आनंद बासटवार, वैजनाथ मोरलवार, रामचंद्र कोटलवार, पुरुषोत्तम जवादवार,गोविंद सुंनकेवार,पुंडलिक बिरादार व उत्सव समिती भगवान बालाजी मंदिर संस्थान यांनी केले आहे.
