नांदेड| सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिण्याच्या पहिल्या रविवारच्या नियमित व्यापक बैठकीत डाॅ.हंसराज वैद्य हे बैठकिच्या अधक्षिय समारोह प्रसंगी बोलत होते.मंचावर गिरिष बार्हाळे, प्रभाकर कुंटूरकर, माधवरावजी पवार काटकळंबेकर अदि मान्यवर उपस्थित होते.
कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कितीही व कशाही “महायुत्या” तथा “महाआघाड्या” करू द्यात, नांदेड जिल्ह्याच्या नऊही विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाचे आशिर्वाद ज्या पक्षाच्या उमेदवारास मिळतील तोच नक्की आमदार होऊ शकेल अशी परिस्थिती सद्याला झाली आहे.कुणीही आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसू द्या, त्याचे गुडघ्याचे बाशिंग गुडघ्यालाच राहील!त्याच्या नशिबी हार तूरे व गुलाल नाहिच.
सर्व पक्षाच्या नेत्यांना व इच्छुक उमेद्वारांनां आमचे ज्येष्ठ नागरिकांचे उघड उघड आवाहान आहे की,आज आमची खुली,रिकामि व कोरी पाटी पाहे! आज आम्ही कुण्याही पक्षाच्या दावणीला बांधले गेलेलो नाहित! खुले तथा मोकळे आहोत. महाराष्ट्र शासनाचे,ज्येष्ठांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्या साठी भरपावसात नुक्तीच “गरिब गरजवंत ज्येष्ठ माय-बाप नागरिकांची लक्षवेधी प्रभात फेरी” काढण्यात आली होती.प्रभात फेरीला प्रचंड संख्येनी ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले होते.पण शासनाचे लक्ष वेधले गेल्याचे दिसत नाही.शासन ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आजिबात उत्सूक तथा गंभीर दिसत नाही.
.
आमचे शासनास व सर्वच प्रमुख राजकिय पक्षांना जाहिर व खूले आवाहान आहे की जो कोणता पक्ष आमचे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्नः- (1)ज्येष्ठ नागरिक धोरण तत्वतः अंमलात आणावे. (2)2007चा पारित कायदा,2010चे पारित नियम तथा 2013चा पारित कायदा तंतोतंत अंमलात आणावेत. (3)जागतिक पातळीवर सर्व मान्य वय वर्ष साठ (60) च ग्राहय धरावे.
(4)देशातील ईतर व शेजारिल आंध्र,कर्णाटक,तेलंगाणा अदि राज्या प्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने गरिब गरजवंत, दुर्लक्षित,उपेक्षित,वंचित शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी,कामगार,विधवा माता तथा दिव्यांगाना 3500/-रू.प्रतिमहा मानधन “लाडले माय-बाप योजणे” अंतर्गत विशेष तथा खास बाब म्हणून सरळ खात्यावर जमा करावेत. (6)कुटूंबा परत्वे एक ते चार व एकूण जनसंख्येच्या आठरा टक्के ज्येष्ठांची संख्या लक्षात घेऊन एक महिला तथा एक पुरूष ज्येष्ठ नागरिक विधान परिषद व राज्यसभेवर घेण्याची तरतूद करावी.
(7)ज्येष्ठ नागरिकांचा राष्ट्र उभारणीत तथा निर्मितीत सिंहाचा वाटा व समर्पण लक्षात घेवून ज्येष्ठ नागरिकांना “राष्ट्रीय संपत्ती”घोषित करणे अदि व इतर मागण्या प्राधान्याने सोडविण्यास जो कोणता पक्ष उत्सूक असेल,येत्या विधान सभा निवडणूकीच्या जाहिरनाम्यात ज्येष्ठ नागरिकांचे हे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे लेखी स्वरूपात सर्व प्रथम मान्य करेल त्या पक्षाच्या उमेदवारासच आपण मतदान करूयात. पहिल्यानं यावं,टिकली मारून जावं! ज्येष्ठांच्या आशिर्वादनं,आमदार बणावं (अर्थात फर्स्ट कम फर्स्ट)!!
समजा कोणताही पक्ष पुढे आला नाही,तर मग नकारार्थी (NONE OF THE ABOVE)अर्थात “NOTA” ला,नाराजी,असंतोष तथा निषेध म्हणून नोंद करूयात आणि आता या पुढे एकसंघ राहून आपण फुकट मतदान करायचे नाही,कुठल्याही भूल थापांना तथा अमीषाला बळी पडायचे नाही, विकले जायचे नाही.सर्वांना हे मान्य आहे का? म्हणताच सर्व उपस्थितांनी हात वर करून होकार दिला.