नांदेड| येथील रेल्वे आरक्षण कार्यालय शेजारी गाडी पार्क करून प्लॅटफॉर्मवर गेले असताना अज्ञात चोरट्याने होंडा शाईन १२५ सीसी ही गाडी चोरीला गेला आहे.
नांदेड रेल्वे स्टेशन येथून दिनांक १६ डिसेंबर (सोमवार) रोजी दीपक पाठक रा. सोमेश कॉलनी, कलामंदिर मागे नांदेड हे कामानिमित्त सकाळी ९:३० च्या सुमारास रेल्वे आरक्षण कार्यालय शेजारी गाडी पार्क करून प्लॅटफॉर्मवर गेले होते.
अवघ्या ३० मिनिटात त्यांच्या मालकीची होंडा शाईन १२५ सीसी ही दुचाकी चोरट्याने लंपास केली आहे. सदरील घटनेची रीतसर तक्रार देऊन वजिराबाद पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरात वाहन चोरीच्या असंख्य घटना घडत असून चोरांच्या मुसक्या आवळल्या जाव्यात अशी अपेक्षा नांदेडकर एकमुखाने करत आहेत.