उस्माननगर l कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार असलेले एकनाथ दादा पवार यांचे विश्वासू व खंदे समर्थक म्हणून सुपरिचित युवासेनेचे कंधार तालुका प्रमुख संदीप पाटील काळम यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या पदधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने उबाठा गटाला खिंडार पडले .


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कंधार तालुक्यात पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. उबाठा मधील बेशिस्तीमुळे आणि निष्क्रियतेमुळे अनेक जणांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असून युवा सेनेचे कंधार तालुका प्रमुख संदिप पाटील काळम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज खा.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे .

हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविल्यामुळे पक्षातील बेशिस्त आणि नाकर्तेपणाला कंटाळून अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील युवा सेनेचे कंधार तालुका प्रमुख संदिप पाटील काळम यांनी आज मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम, शिवसेना सचिव सिद्धेश भैया कदम आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवा सेना विधानसभा प्रमुख सतीश पाटील बाबर , भोकर विधानसभा प्रमुख राजेश डाखोरे , नांदेड उत्तर तालुकाप्रमुख शिवाजी पावडे , मुदखेड तालुका प्रमुख शिवाजी गाडे , अर्धापूर तालुकाप्रमुख दीपक कदम , भोकर तालुकाप्रमुख माधव करेवार , उमरी तालुकाप्रमुख शिवानंद भालेराव.

भोकर शहर प्रमुख कृष्णा कुंडलवाड , लोहा शहर प्रमुख गजानन करडे, अर्धापूर शहर प्रमुख बाळासाहेब खराटे , मुदखेड तालुका उपप्रमुख संजय पाटील पांगरगावकर आदींनी मा.एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. संदीप पाटील काळम यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने कंधार तालुक्यामध्ये युवा सेनेला मोठे बळ मिळणार आहे शिवाय असंख्य तरुणही शिवसेनेत प्रवेश करतील असा विश्वास यावेळी संदीप पाटील काळम यांनी व्यक्त केला.
