नवीन नांदेड l सिडको सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित शिवजयंती निमित्ताने भव्य मिरवणूक नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी लेक्षीम पथकाच्या सहभाग व लक्षणीय महिलांच्या उपस्थित भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.


या मिरवणुकीचे मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले तर विविध प्रतिष्ठाने, सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अन्नदान वाटप व पाणपोई व्यवस्था केली, खासदार रविंद्र चव्हाण हे ही या मिरवणुकीत सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.

19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या वतीने सकाळी सिडको हडको परिसरातील महापुरुष यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तर, दुपारी चार वाजता हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथुन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, परिसरातील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज दाखवून भव्य मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली.

या मिरवणुकीत मध्ये मनपाचे उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय पाटील घोगरे,उदयभाऊ देशमुख,राजु पाटील घोगरे, माजी नगरसेवक संजय इंगेवाड सिध्दार्थ गायकवाड ,सतिश बसवदे ,राजु लांडगे , प्रल्हाद टेहरे, डॉ. अशोक भिसे, रवि थोरात,उध्दव पाटील शिंदे,सुहास खराणे, महेश शिंदे, तुलजेश यादव,यांच्या सह सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी त्र्यंबक कदम, साहेबराव गाढे,दिलीप कदम व पदाधिकारी, महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

या मिरवणुकीत सिडको हडको परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विध्यार्थी लेझीम पथक घेऊन विविध कवायती सादरीकरण केले तर ढोलताशांच्या गजरात फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत व अन्नदान वाटप करण्यात आले, जिजाऊ गुप्र यांच्या वतीने महाराणा प्रताप सिंह पुतळा , व्यापारी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, माधवराव पाटील ढाकणीकर यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले.
जुना कौठा येथे नगरसेवक राजू पाटील काळे यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले,तर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गावांत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.सिडको हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ग्रामीण व शहरी भागातील नागरिक व युवक यांनी अभिवादन केले.