नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने उद्या ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होणार आहे. या उत्सवा निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी सालाना बरसी उत्स वात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल झाले आहेत. उत्सवा ची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती लंगर साहिब चे प्रमुख जत्थे दार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी दिली.
लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येणार आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, संत बाबा गुरूदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब,नानकसर संप्रदाचे मुखी संत बाबा घालासिंघ, संत बाबा जोगा सिंघ कर्नालवाले,माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक सरदारडॉ विजय सतबिर सिंघ यांची उपस्थिती राहणार आहे.
गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने आज 3 ऑगस्ट रोजी मोफत दन्त चिकित्सा शिविर नांदेड येथे नगीना घाट येथील संत बाबा निधान सिंघ जी मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार केले जातात. डॉ.सुरेश दगडीया,डॉ.विद्या अश्विन दरबस्तेवार,डॉ अमरप्रीत कौर,डॉ.रुणाली पिंपरवार,डॉ.शरयू दसावर,डॉ.वैष्णवी बबल्स हे तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत. बाबा अमरजीतसिंग टाटावाले, बाबा हरजिंदर सिंग आणि डॉ प्रकाश बोटलावार यांच्या संयोजनाखाली उपरोक्त शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी केले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होईल आणि शिबिर दुपारी ३ पर्यंत चालेल असे बाबा अमरजीतसिंग टाटावाले यांनी सांगितले.