मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रेरणादायी सहभागाने जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात स्वच्छता -NNL

0

नांदेड| मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीने कर्मचार्‍यांना स्वच्छतेचे महत्‍व आणि त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रभावीपणे पटवून दिले.

कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्‍वच्‍छ व निटनेटका राहावा यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दर महिन्‍याच्‍या 25 तारखेला जिल्‍हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालयात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज या माहिमेचा जिल्‍हा परिषदेत शुभारंभ करण्‍यात आला. मोहिमेच्‍या पहिल्‍याच दिवशी परिषदेसह जिल्‍हयातील सर्व कार्यालयातून स्‍वच्‍छता करण्‍यात आली. यावेळी सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रसाद चन्‍ना, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, कृषी अधिकारी व्‍ही.आर. बेतीवार आदींची उपस्थिती होती.

 

मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या स्‍वच्‍छता मोहिमेमुळे कर्मचार्‍यांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे, उच्च पदावरील अधिकारी देखील त्यात सहभागी होऊ शकतात. कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करून सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छतेचा उपक्रम सातत्‍याने राबवावा, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या सहभागामुळे स्वच्छता मोहिमेला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. स्वच्छतेबद्दलची जागरूकता व आवड निर्माण करुन दर महिन्‍याच्‍या 25 तारखेला सर्व खाते प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्‍वच्‍छ व सुंदर करावा असे आवाहनही मख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

तालुका स्‍तरावर स्‍वच्‍छता
मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या उपक्रमाला तालुका स्‍तरावरील सर्व कार्यालयातून उस्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. पंचायत समिती, तालुका आरोग्‍य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत आदी कार्यालयातून स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, तालुका आरोग्‍य अधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, विस्‍तार अधिकारी, उप अभियंता, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्‍य अधिकारी, आरोग्‍य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती आदींनी सहभाग घेतला.

एक दिवशीय स्‍वच्‍छता मोहिमेतून सर्व कार्यालयातून स्‍वच्‍छता मोहिमेत टेबल-खुर्ची सफाई, कपाट स्‍वच्‍छता, काही कार्यालयात सिक्‍स बंडल पध्‍दती, कपाटात ठेवावयाच्‍या फाईल्‍स व त्‍याची वर्गवारी करण्‍यात आली. यवेळी कार्यालयाच्‍या स्‍वच्‍छतेसह परिसराचीही स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या मोहिमेतून सर्व कार्यालयातून हजारो टन कचरा निघाला आहे. यावेळी नियमित स्‍वच्‍छता करुन कार्यालय व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍याचा संकल्‍प अधिकारी व कर्मचा-यांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here