अर्धापुर/नांदेड। उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्र येणाऱ्या खडकुत खुर्द (ता नांदेड) या शिवारातील ईसापुर कालव्याच्या , लहान, मोठ्या वितरेकेचे काम उन्हाळ्यापासून सुरू आहे. संबंधित कंत्रातदाराने हे काम पूर्ण न करता काही शेतकऱ्यांच्या शेतात आणून कॅनलचं काम थांबविले आहे. त्याचा फटका या शेतकऱ्यांना पडला असून ईसापुर धरणातून येणाऱ्या पाणी उपशातून शेतीत पाणी साचल्यामुळे पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कॅनल दुरुस्ती संदर्भात तातडीची मागणी केली आहे.
अर्धापूर तालुक्यात सध्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या छोट्या, मोठ्या वितरेकेचे काम सुरू आहे. खडकुत खुर्द शिवारात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून येणाऱ्या कॅनलचे लहान कालव्यांचे काम परिसरातील सर्वच भागात उन्हाळ्यापासून सुरू आहेत. संबंधित कंत्रातदाराने संबंधित शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता चालढकल केल्यामुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीत शिरल्या आहे. बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे कंत्राटदार ऐकून घेत नसल्याने नांदेडचे तहसीलदार उमेश भुतेकर यांच्याकडेही धाव घेतली व आपली व्यथा मांडली. तहसीलदारांनी या प्रकरणी लक्ष घालून कंत्राटदाराला दुरुस्तीच्या सूचना करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मागील तीन दिवसापासून संबंधित पाणीपुरवठा हा तसाच सुरू असून हजारो लिटर पाणी भर उन्हाळ्यात वाया जात आहे. त्यासोबतच पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे शेती मशागतीचे काम पूर्णपणे अडचणीत आले आहेत त्यासोबतच येथील उभे पीकही पाण्यामुळे नुकसाग्रस्त झाले आहेत. या प्रकरणी लक्ष घालून तातडीने कॅनॉल मधून वाया जाणारा पाणीपुरवठा थांबवावा अशी मागणी शेतकरी कंकाळ, सोनी यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.