नवीन नांदेड l नुकत्याच जाहीर झालेल्या सिमेन्स कंपनीच्या निकालात एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड येथे शिक्षण घेत असलेल्या 9 विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठेची सीमेन्स शिष्यवृत्ती मिळविली आहे.


यामध्ये संचिता सोनवणे,प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी कृष्णाई मांगलेकर, प्रथम वर्ष,माहिती तंत्रज्ञान सपना गाडेकर,प्रथम वर्ष, माहिती तंत्रज्ञान श्रुतिका खांडील,प्रथम वर्ष, माहिती तंत्रज्ञान अभिषेक वाघ, प्रथम वर्ष, यंत्र अभियांत्रिकी मोनिका राठोड, प्रथम वर्ष, इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग अनुष्का जगताप,प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी सानिका भोसले, प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान. मयुरी अलवार, प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना हे यश संपादन केल्यामुळे शिष्यवृत्ती स्वरूपात खालील फायदे मिळणार आहेत- चार वर्षाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ति.

दरवर्षी रु.40000-00 पुस्तके खरेदी, स्टेशनरी, वस्तीगृह शुल्क इत्यादी साठी. लॅपटॉप खरेदी एक वेळ.त्यांना प्रथम वर्ष, समन्वयक डॉ.किरन सानप यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळांचे अध्यक्ष सुनीलजी रायठ्ठा, संस्थेच्या नियमक मंडळाचे इतर सदस्य, संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे,संस्थेतील सर्व अधिष्ठाता,विभाग प्रमुख, प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
