नांदेड l पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल नांदेड दौऱ्यावर असून त्यांनी काल शनिवारी येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा मध्ये जाऊन माथा टेकला.
मुख्यमंत्र्यांच्या आई किती साधेपणाने दर्शन घेतात त्याचा प्रत्यय नांदेड येथील गुरुद्वारामध्ये आला. कुठलाही सुरक्षेचा लवाजवामा न दाखवता त्यांनी सर्वसामान्य यात्रे करून प्रमाण गुरुद्वारे जाऊन दर्शन घेतले. श्री गुरुगोविंदसिंग जी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या नांदेड नगरीत येऊन आपल्याला धन्य वाटले. येथील गुरुद्वारा चे प्रमुख पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ यांची यांनी भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. गुरुद्वाराच्या निष्काम सेवेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
गुरुद्वारा लंगर साहिब चे मुखी संत बाबा नरेंद्रसिंग जी तथा संत बाबा बलविंदरसिंग जी यांच्या कार्याचे श्रीमती हरपाल गोरे यांनी कौतुक केले. त्यांच्या सोबत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रल्हाद भालेराव, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे व श्रेयस कुमार बोकारे हे होते.