नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्त काळेश्वर मंदीर विश्वस्त समिती व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री माता रत्नेश्वरीदेवी जानापुरीस साडी-चोळी अर्पण ,विष्णुपूरी ते माता रत्नेश्वरी देवी मंदीर पदयात्रा पालखी सोहळयास विष्णुपूरी गावातील समस्त गावकरी, महिला यांनी सहभाग नोंदविला.
दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबर्डे यांनी गोदावरी नदीतील पाण्याने भरलेल्या कलश व महादेव पिंड मुर्ती पुजन केल्यानंतर या भव्य पालखी पदयात्रा सोहळ्याला सुरूवात झाली. दरवर्षी प्रमाणे याही चौथ्या वर्षी 9 ऑक्टोबर 24 रोजी सकाळी 8 वाजता आमदार मोहनराव हंबर्डे, काळेश्वर मंदीर विश्वस्थ व सर्व विष्णुपूरी गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत कलश पुजन व महाआरती झाल्यानंतर सुरूवात झाली, प्रारंभी विधीवत रथ यात्रा माता रत्नेश्वरी जानापुरी साडी चोळी पुजन करण्यात आले. यावेळी काळेश्वर भगवान कि जय, जय माता दी घोषणा देण्यात आल्या. यानंतर भजन, ढोलताशांच्या गजरात ही पदयात्रा निघाली यावेळी विष्णुपूरी गावातील जेष्ठ नागरिक,युवक, महिला,यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी धारोजी हंबर्डे,बालाजीराव हंबर्डे,मधुकरराव हंबर्डे, नाजीम बॅक संचालक शिवाजी लुटे, दिंगाबरराव हंबर्डे, गिरमाजी हंबर्डे,शिवप्रसाद कुबडे,प्रताप हंबर्डे,साहेबराव हंबर्डे, ॲड.जयसिंग हंबर्डे, नरसिंग हंबर्डे, सतिश भेडेकर, संभाजी शेंबोले, आनंद हंबर्डे, पप्पू हंबर्डे,ओम पाटील, व मान्यवर सहभागी होते. पदयात्रा पोहचल्या नंतर माता रत्नेश्वरी विश्वस्त समिती यांच्या वतीने आ. हंबर्डे यांच्या वतीने माता रत्नेश्वरी यांच्या साडी चोळी आहेर व विधीवत पुजन करण्यात आले, यावेळी कलश मधुन आणलेले गोदावरी नदीचे पाणी माता रत्नेश्वरी कुंडात टाकण्यात आले व महाआरती झाल्यानंतर या पदयात्रेची सांगता झाली.