मुंबई| काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे खासदार स्व. वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली व वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली तसेच चव्हाण कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार मोहनराव हंबर्डे आदी उपस्थित होते.