हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरात काल दिनांक 24 /8 /2024 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन झालेल्या पावससात, वीज पडून टेंभुर्णी येथील शेतकरी विलास पाटील यांचा बैल दगावला आहे. ऐन पोळा सणाच्या पूर्वी बैल दगावल्याने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देऊन यातून बाहेर काढावे अशी मागणी केली जाते आहे.
हिमायतनगर शहर व तालुक्यात दिनांक 24 रोजी सायंकाळी आभाळात काळ्याकुट्ट ढगांनी जागा घेतली. त्यामुळे मोठा पाऊस होईल अशी अपेक्षा होती, दरम्यान विजांचा कडकडाट वादळी वारे यात झालेल्या अल्पशा पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा निराश केले आहे. दरम्यान विजांचा कडकडाट होऊन टेम्भुर्णी येथील सरपंच प्रल्हाद पाटील यांचे बंधू भाऊ विलास भाऊराव माने, पाटील यांचा बैल त्यांचे शेत शिवार क्रमांक 44/1 मध्ये असलेल्या गोठ्या समोरील झाडा खाली बांधलेला असतांना वीज कोसळली यात एक बैल मरण पावला. तर दैव बलवत्तर म्हणूज बाजूच्या बैलास व गाई वसारसं काही झाले नाही.
ऐन शेतीच्या कामात आणि तोंडावर बैलपोळा सण येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांवर हे संकट कोसळले आहे. अगोदरच यंदा पाऊसमान कमी असल्याने पिकांची पाहिजे तशी फळधारणा होत नसल्याने शेतकरी चिंतेत असताना आता या निसर्गाच्या प्रकोपात शेतकर्याचा कामाचा बैल दगावल्याने अंदाजे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून, या घटनेचा पंचनामा करून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकट दूर करण्यासाठी तात्काळ मदतिचा हात द्यावा अशी मागणी केली जाते आहे.