हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर शहरासह तालुक्यात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी पासून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. तसेच बॅटरींची चोरकरण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारावर आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षकाकडून मिळाल्यानंतर हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर यांनी जमादार अशोक सिंगनवार व त्यांच्या टीमला चोरट्याच्या तपास कामी रवाना केले होते. हिमायतनगर पोलीस टीमने ट्रॅक्टरच्या बॅटरी चोर व दुचाकी चोरास मुद्देमालासह अटक केली आहे. हिमायतनगर पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे शहरातील नागरिकातुन पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
तसेच आत्ताउल्ला खान, यांच्या तक्रारीवरून दाखल असलेल्या लकडोबा चौकातील सार्वजनिक रोडवरून चोरीला गेलेल्या मोटार सायकल चोराचा तपास कामी रवानगीत असलेले जमादार अशोक सिंगणवाड, पोलीस नाईक नागरगोजे यांनी अब्दुल रहेमान शेख चांदपाशा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी त्याने शेख अबुजर शेख मुसा वय 19 वर्ष यास सोबत घेऊन दोघांनी दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून शेख अबुजर शेख मुसा यास दि15 रोजी अटक केली होती. त्यास न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. या काळात चौकशी केली दोघांनी मिळून 6 मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यात 2 स्प्लेन्डेर गाडी, 2 युनिकॉन, 1 बुलेट,1शाईन अश्या सहा गाड्या असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्या आहेत. सदर आरोपीनी आणखी दुचाक्या चोरल्या असल्याची शंका असल्याने त्या दिशेने तपास सुरू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना, पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. ही माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक, बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस नाईक आऊलवाड, पोलीस शिपाई जिंकलवाड, कुलकर्णी आदींसह हिमायतनगर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे शहरातील नागरिकांतुन अभिनंदन केले जात आहे.