नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र सरकारच्या 8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण सेवा या विषयांवर अधारीत भव्य बहूमाध्यम प्रदर्शानाचे आयोजन लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वा. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
हे प्रदर्शन दिनांक 22 ते 26 डिसेंबर 2022 कालावधी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यत सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो नांदेडच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहुमाध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या 8 वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याण सेवा निमित्त सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती या बहूमाध्यम प्रदर्शानातून दर्शवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदींची उपस्थिती राहणार आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनास भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन नांदेड येथील केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांच्यावतीने करण्यात आले आहे.
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेनिमित्ताने गुरूवार 22 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी 22 डिसेंबर रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. या तपासणी बाबत दिनांक मेसेजद्वारे देण्यात येणार आहे. दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पुढील एक आठवडयापर्यंत स्विकारण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व वाहन मालक-चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.