हिमायतनगर। तालुक्यातील मौजे पारवा खुर्द येथील युवा शेतकरी पिकाला वडील पाणी देतांना लाईट गेली, म्हणून फेस टाकण्यासाठी गेला असता जबरदस्त शॉक लागून दुर्दैवी मृत्यू ओढवला गेला आहे. सुधाकर पतंगे या युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे.
याबाबत सविस्तर व्रत असे की, हिमायतनगर तालुक्यातील शेवटच्या टोकांवर असलेल्या मौजे पारवा खुर्द येथील युवा शेतकरी आपल्या वडिलांसोबत शेती कामे करून हातभार लावत होता. काल दिनांक 19 रोजी सुधाकर पतंगे हा अपल्यावडीला सोबत शेतीकामात व्यस्त होता. वडील पिकाला पाणी देत असल्याने अचानक सकाळी वीज गुल झाली. त्यामुळं शेतीला पाणी देण्याचं काम थांबलं होतं. फेज कटल्याने लाईट गेल्याचे लक्षात आल्याने युवा शेतकरी सुधाकर हा फेस टाकत असातांना अचानक वायर हातात आल्याने जबरदस्त शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.
वयाच्या 20 व्या वर्षी नियतीने सुधाकरचा जीव घेतला, सुधाकर वडीलाला एकुलता एक मुलगा होता. अतीशय प्रेमळ स्वभावाचा सुधाकर या युवा शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबातील सदस्यांसह गावकरी नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, सुधाकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. नांदेड न्यूज लाईव्ह परिवार पतंगे कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून, त्यांना ईश्वर चिरशांती देवो हीच भावपुर्ण श्रध्दांजली…💐💐💐