हदगाव, शेख चांदपाशा| वक्त का इंतजार किजीऐ जनाब वादा है बहुत बेहतरीन ‘नजारा ‘ दिखायेगें अशी पोस्ट हिगोली लोकसभाचे माजी खा सुभाष वानखेडे ह्याच्या सोशल मिडीया वरील स्टेटसने नागरिकात धमाल उडवलेली असुन, नेमके विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ त्याचे हे स्टेटस फारच चर्चिल्या जात आहे.


हदगाव विधानसभाक्षेञाचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी जो महाविकास आघाडीचा पुढचा फिक्स उमेदवार मीच ह्या दाव्याची धार कुठे तरी बोधट तर होणार नाही ना..? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच काँग्रेसचे आमदार ‘क्रास वोटीग’ मध्ये चर्चिल्या जात होते नंतर त्यांनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठीला पटवून दिले की ‘तो मी नव्हेच..आता शिवसेनेतर्फ महाविकास आघाडीत शिवसेना प्रमुख उद्वव ठाकरे यांनी आदेश दिला तर आपण हदगाव विधानसभेची निवडणूक लढू अस माजी खासदार वानखेडे यांनी काही दिवसा पुर्वी जाहीर केल होत.


नुकत्याच संपन्न झालेल्या माञ लोकसभेच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या आ.प्रज्ञाताई सातव, शिवसेनेचे माजी खा. सुभाष वानखेडे यांनी प्रचार केला नसल्याच गंभीर आरोप हिगोली लोकसभाचे महाविकास आघाडीचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी केल्याने काही काळ खळबळ माजली होती. माञ नवनिर्वाचित खा.आष्टीकरच्या या आरोपला पक्षश्रेष्ठीनी फारस गार्भियान घेतल्याच दिसुन येत नाही. या बाबतीत माञ आ. प्रज्ञाताई सातव यांनी त्यांच्या आरोपाला ‘जैसे थे ‘उत्तर दिलेले आहे.


यामुळे या खा.आष्टीकर यांनी केलेल्या आरोपाची सध्या फारशी चर्चा होतांना दिसून येत नाही. माञ माजी खा. सुभाष वानखेडे याच्या बेहतरीन नजारा दिखायेगें ह्या स्टेटसने हदगाव विधानसभा क्षेञांत नागरिकात शिवसैनिकात व त्यांच्या चाहत्या मध्ये भूरळ टाकली असुन, सर्वत्र चर्चा होतांना दिसुन येत आहे.



