नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पीएच.डी. कोर्सवर्क हिवाळी-२०२४ या परीक्षेचे आवेदनपत्र (Under ‘Swaratim’ University Ph.D. Application form for coursework examination by 27th February) दि. १४ फेब्रुवारी ते दि. २७ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.


विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित संशोधन केंद्रातील पीएच.डी. कोर्सवर्क अनुउत्तीर्ण (Backlog) विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२४ परीक्षेचे आयोजन मार्च-२०२५ मध्ये करण्यात येणार आहे. या परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन व लेखी पद्धतीने (पेन अँड पेपर) द्वारे घेण्यात येणार आहेत.

या पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्र आपल्या संशोधन केंद्रामध्ये दि. २७ फेब्रुवारी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. त्यानंतर संशोधन केंद्रांनी Online Exam Portal द्वारे सर्व आवेदनपत्र दि. २७ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन करून त्याची एक प्रत परीक्षा आवेदनपत्रा सोबत परीक्षा विभागात सादर करावी. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.
