शिवणी, भोजराज देशमुख| यावर्षी दिवाळीच्या नंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होतील असे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यावर यात विविध राजकीय पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असून.किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी अभियानाला सुरुवात केली असून मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्त्यांनी जाऊन आपल्या निशाणीची ओळख करून द्यावे असे सूचना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे.
त्याच अनुषंगाने किनवट तालुक्यातील ईस्लापुर जिल्हा परिषद सर्कल मध्ये मागील काही महिन्यांपासून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पक्ष वाढीसाठी व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गटाला नव्याने मिळालेल्या निशाणीला घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी कंबर कसली आहे असे दिसून येत आहे.तर नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा गणित लावल्याने सर्कल मधील गावागावासह वाडी तांड्यात आगामी काळात मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने पक्ष वाढीचे काम जुमाने चालू केले आहे.असे दिसून येत आहे.
तर आगामी निवडणूक लक्षात घेऊन ईस्लापूर शिवणी, अप्पारावपेठ,कोसमेट, मलकजाब, गोडजेवली, तोटंबा, सह विविध वाडी तांड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावातील लोकांच्या निदर्शनास आणून देऊन माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गेल्या 15 वर्षीत केलेले विकास व सर्वसामान्य माणसाच्या सुखा दुःखात सहभागी होऊन सर्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विविध गाव व वाडी तांड्याच्या सार्वजनिक ठिकाणी बैठका घेऊन महिला,पुरुष,जेष्ठ नागरिक व नवमतदार मंडळीना तुतारी वाजवणारा माणूस ही आपली निशाणी आहे असे सांगून पक्षवाढीचा प्रचार करतांना दिसून येत आहे.
या सोबतच माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून अबकी बार प्रदीपजी नाईक आमदार म्हणत तरुणांनाई विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. तर तांड्या वस्त्यामधील नवयुवकांनी यावेळी प्रदीपजी नाईकांना आमदार बनविल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार करत आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाच्या ईस्लापूर शिवणी सर्कल सह वाडी-तांड्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेताना दिसून येत आहे. याभागात माजी आमदार प्रदीप नाईक यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.